बस  sakal
नाशिक

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या रात्रीतून १७ बस पंक्चर

एन. डी. पटेल रोडवरील डेपोतील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : एस. टी. महामंडळाच्या सुमारे १७ बस अज्ञात व्यक्तींकडून शनिवार (ता. २७) रात्रीच्या सुमारास पंक्चर केल्याची घटना घडली आहे. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसंदर्भात एसटी महामंडळाच्या कामगार संघटनांकडून कामबंद आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी (ता. २६) काही संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली. शनिवारी (ता. २७) काही कर्मचारी कामावर हजर झाल्याने काही मार्गांवरील बससेवा सुरू करण्यात आली. पोलिस बंदोबस्तात एन. डी. पटेल रोड येथील डेपोमधून बस सोडल्या. कर्मचाऱ्यांकडून कामावर हजर राहण्याच्या प्रकारास गालबोट लागले. धुळे मार्गावर शनिवारी तीन बसवर अज्ञातांकडून दगडफेक करत बसच्या काचा फोडण्यात आल्या.

तर मध्यरात्रीच्या सुमारास डेपोच्या आवारात उभ्या असलेल्या महामंडळाच्या सुमारे सतरा बसची हवा सोडण्याचा प्रकार घडला. रविवारी (ता. २८) सकाळी कर्मचारी, अधिकारी कामावर हजर झाले असता, प्रकार उघडकीस आला. बसचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व बसचे पंक्चर काढून बस सुव्यवस्थित करण्यात आल्या. हा प्रकार कोणी केला असावा, याबाबतची माहिती अधिकाऱ्यांना मिळू शकली नाही.

परंतु ज्या बसचे पंक्चर करण्यात आल्या त्यांची संपूर्ण माहितीसह अज्ञात व्यक्तीकडून प्रकार घडून आणल्याचे पत्र एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून भद्रकाली पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे. बस फोडण्यासह पंक्चर करण्याच्या घटना घडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये काहीसे तणावाचे वातावरण आहे. शिवाय अन्य कुठल्या प्रकारचे नुकसान करण्याची शक्यता असल्याने रविवारी एकही मार्गावर बस सोडली नसल्याचे सांगण्यात आले. कामबंद आंदोलनास आणखी कुठले वळण लागेल, हे सांगणे कठीण झाल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT