Plastic-Ban
Plastic-Ban esakal
नाशिक

Nashik: प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर 17 गुन्हे दाखल! सिडकोत व्यावसायिकांकडून 82 हजारांचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा

Nashik : नाशिक महापालिका हद्दीत प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे बंद असतानाही सिडको भागात काही बेजबाबदार व्यवसायिकांकडून सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे.

अशा बेजबाबदार व्यावसायिकांवर मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असून दहा दिवसात १७ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करत ८२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (17 cases filed against those using plastic bags 82 thousand fine from cidco professionals Nashik)

मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्लॅस्टिक पिशव्यांच्या कारवाईबरोबरच हॉस्पिटलचा बायो वेस्ट कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यावसायिकांवर कारवाई करत ४० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

तसेच, कचरा वर्गीकरण न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, रस्त्यावर सांडपाणी सोडणे, बांधकाम राडारोडा सार्वजनिक ठिकाणी टाकणे अशा ९ जणांवर कारवाई करीत १७ हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तर, सार्वजनिक रस्त्यावर बायोमेडिकल वेस्ट टाकल्याबाबत एका डॉक्टरवर कारवाई करत २५ हजार असे १७ गुन्हे आणि एकूण ८२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार,

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक कल्पना कुटे, विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील तसेच, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.

स्वच्छता निरीक्षक आर. डी. मते, रावसाहेब रूपवते, जितेंद्र परमार, विशाल आवारे, राहुल गायकवाड, संतोष गायकवाड, राजाराम गायकर, अजय खळगे, विजय गोगलिया, संग्राम साळवे, विजय जाधव, मिलिंद जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT