crime news sakal
नाशिक

Nashik : दगडफेक प्रकरणी 18 संशयित ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : गंजमाळ परिसरात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना रविवारी (ता. २१) सायंकाळी घडली. भद्रकाली पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

जुना वादातून दोन गटांमध्ये रविवारी सायंकाळी दोन गटांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली होती. काहींनी परिसरात उभे असलेल्या वाहनाची तोडफोड करत नुकसान केले होते. त्यानंतर जमावाने पोलिस ठाण्याकडे आपला मोर्चा वळवला होता. गंजमाळ परिसरासह पोलिस ठाण्यात तणावाचे वातावरण होते.

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना यांच्यासह वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार, निरीक्षक दिलीप ठाकूर तसेच विजय ढमाळ, आँचल मुदगल यांच्यासह अन्य अधिकारी रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते.

मध्यरात्री सुमारे एकच्या सुमारास दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांकडून गुन्हे दाखल झाल्यानंतर रात्रीपासूनच संशयितांची धरपकड सुरू होती. सोमवारी (ता.२२) दुपारपर्यंत दोन्ही गटाच्या सुमारे १८ संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. सोमवारीही उशिरापर्यंत संशयितांचा शोध सुरू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Viral News: मुंबई मेट्रोत मांजरीला लागली 'नोकरी'! MMMOCL ने दिलं Chief Feline Officer पद, ड्युटीही ठरवली

Hospital Fire Audit : आरोग्य विभागाचे वरातीमागून घोडे; अमरावती दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट

Mehkar Hospital Negligence : मेहकरमध्ये रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटरवर रस्त्यावर प्रसूती; आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत नाकारल्याने संताप

Marathi News Live Updates : एका व्यावसायिक इमारतीत आग

IND vs SL: 'तू वेळ वाया घाववतोय ब्रो...', सर्फराज खानची श्रीलंकन कर्णधाराला स्लेजिंग, Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT