Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: गाळा खरेदीत 19 लाखांची फसवणूक; तरुणाची दिल्लीत आत्महत्या

तिघांविरोधात पीडित तरुणांच्या वडिलांची तक्रार: 19 lakh fraud in the purchase of shop...

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : वर्षभरापासून रक्कम घेऊनही व्यापारी संकुलातील गाळ्याची खरेदी करून दिली नाही. खरेदी करून द्या किंवा रक्कम परत द्या, अशी मागणी केली, तर उलट दमबाजी होत होती.

अखेर वावी ठुशी (ता. निफाड) येथील वैफल्यग्रस्त तरुणाने दिल्ली येथे आत्महत्या केली. पीडित तरुणांच्या वडिलांनी तिघांविरोधात पिंपळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. (19 lakhs fraud in purchase of shop Youth commits suicide in Delhi Nashik Fraud Crime)

माधवराव जगताप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलगा ज्ञानेश्‍वर माधवराव जगताप (रा. वावी, ता. निफाड) यांचा पिंपळगाव येथील गुरूकृपा संकुलातील गाळा क्रमांक नऊ व दहामध्ये मेडिकलचा व्यवसाय होता.

गाळे भाडेतत्वावर होते. हे दोन्ही गाळे खरेदी करण्यासाठी ज्ञानेश्‍वर जगताप यांनी गाळामालक निवृत्ती वामन भदाणे, अनंत विष्णुभारती गोसावी व गितेश तानाजी बनकर यांना ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे १९ लाख ११ हजार दिले, पण दोन-तीन महिने उलटूनही गाळ्याची खरेदी होत नसल्याने भदाणे, गोसावी, बनकर यांनी फसवणूक केल्याचे ज्ञानेश्‍वर जगताप यांच्या लक्षात आले.

खरेदी किंवा पैसे परत द्या, अशी मागणी केल्यानंतर दमदाटी होत होती. अखेर संयम संपलेल्या ज्ञानेश्‍वर जगताप यांनी दिल्ली येथे आत्महत्या केली. पोलिस निरीक्षक अशोक पवार तपास करीत आहेत.

दरम्यान, दिल्ली येथून ज्ञानेश्‍वर जगताप यांचा मृतदेह बुधवारी (ता. १८) सकाळी वावी ठुशी येथे आला. शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. सशंयितांना तत्काळ अटक करा, अशी मागणी जगताप कुटुंब व नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT