Happy farmer
Happy farmer esakal
नाशिक

राज्यातील 198 शेतकऱ्यांचा कृषी पुरस्काराने होणार सन्मान

कुणाल संत

नाशिक : राज्यातील कृषी, फलोत्‍पादन (Horticulture) आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्‍पादन- उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या १९८ शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या (state government) कृषी विभागातर्फे विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे (dada bhuse) यांनी दिली. सोमवारी (ता. २) सकाळी अकराला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (Maharashtra University of Health Sciences) कार्यालयात पुरस्कार वितरण होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) उपस्थित राहतील. सोहळ्यात २०१७, २०१८ आणि २०१९ या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. (198 farmers of the state will be honored with agriculture award Nashik News)

कृषिमंत्री भुसे म्हणाले, की दोन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कृषी विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते, तो कार्यक्रम आता २ मेस होणार आहे. कृषी, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्‍पादन-उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषी विस्‍तारामध्‍ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्‍यक्‍ती, संस्‍था, गट, अधिकारी- कर्मचाऱ्यांना कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडित, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री तथा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, रोजगार हमी, फलोत्‍पादनमंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे आदी उपस्थित असतील.

‘या’ पुरस्कारांनी होणार सन्मान

-डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्‍न पुरस्कार- चार पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी ७५ हजार रुपये)

- वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्‍कार- २८ पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी ५० हजार रुपये)

-जिजामाता कृषिभूषण पुरस्‍कार - ९ पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी ५० हजार रुपये)

- कृषिभूषण (सेंद्रिय शेती) - २३ पुरस्‍कारार्थी (प्रत्येकी ५० हजार रुपये)

- वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्‍कार - ९ पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी ३० हजार रुपये)

- उद्यानपंडित पुरस्‍कार - २५ पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी २५ हजार रुपये)

- वसंतराव नाईक शेतीनिष्‍ठ शेतकरी पुरस्‍कार - सर्वसाधारण गट - ५७ पुरस्‍कारार्थी, आदिवासी गट - १८ पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी ११ हजार रुपये)

-राज्‍यस्‍तरीय पीकस्‍पर्धा- खरीप भात - ९ पुरस्‍कारार्थी, खरीप सोयाबीन ९ पुरस्‍कारार्थी - प्रत्‍येकी प्रथम क्रमांक - १० हजार रुपये, व्दितीय क्रमांक- ७ हजार रुपये आणि तृतीय क्रमांक ५ हजार रुपये

- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्‍न पुरस्‍कार - ७ पुरस्‍कारार्थी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT