2 Child Marriages Stopped at trambak taluka esakal
नाशिक

नाशिक : त्र्यंबक तालुक्यात रोखले 2 बालविवाह

विक्रांत मते

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील टाके हर्ष व वावी हर्ष या दोन गावात दोन मुलींचा बालविवाह (Child Marriage) जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने (Women and Child Welfare Department of Zilla Parishad) रोखला. (2 child marriages stopped in Trimbak taluka Nashik News)

वावीहर्ष येथील ग्रामसेवक किसन राठोड अंगणवाडी सेविका संगीता किर्वे यांनी गावातील बालविवाह होणाऱ्या कुटुंबात जाऊन संबंधित मुलगी व तिचे पालक यांची समजूत काढली त्याचबरोबर टाकेहर्ष या गावातील ग्रामसेवक विजय आहिरे यांनी गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन समुपदेशन (Counseling) केले आणि विवाह थांबवला. टाकेहर्ष अंगणवाडी सेविका अनिता कर्पे, पोलिस प्रशासनाच्या वतीने गोविंद सदगीर, श्री. केदारे उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग व युनिसेफची एकत्रित बैठक रावसाहेब थोरात सभागृहात काही दिवसांपूर्वी झाली होती. त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांनी बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेतील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते.

लगोलग दुसऱ्या दिवशी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी भारती गेजगे यांना रात्री ११ वाजता वावीहर्ष या गावात एका १७ वर्षीय मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती, त्याचबरोबर टाकेहर्ष येथे एका १६ वर्षीय मुलीचा बालविवाह होणार अशी माहिती मिळाली हे दोन्ही बालविवाह रोखण्यासाठी संबंधित दोन्ही गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पोलिस प्रशासन यांना संपर्क करून घटनास्थळी भेट देत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT