Mrs. Mittal looking at the bundles of files in the departments.  esakal
नाशिक

Nashik ZP News : अभिलेख वर्गीकरणासाठी 2 दिवसांचा अल्टिमेटम; जि. प. इमारतीची मित्तल यांच्याकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व विभागांमध्ये अभिलेखांचे वर्गीकरण करणे अपेक्षित असताना झाले नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या निदर्शनास आले.

सर्व विभागांनी आपापले अभिलेखांचे येत्या दोन दिवसांत वर्गीकरण करावे, मुदत संपलेल्या अभिलेखांचे नाशन करावे, अशा सूचना श्रीमती मित्तल यांनी दिल्या. (2 day ultimatum for classification of records to zp department nashik news)

मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी शनिवारी (ता. १२) स्वच्छता पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने मुख्यालय इमारतींची दीड तास पाहणी केली. कृषी विभागाबाहेर बांधकाम विभागाचे अनावश्यक साहित्य पडल्याचे निदर्शनास आले. सदर साहित्य तत्काळ हटविण्याचे आदेश त्यांनी दिले.

वीजवाहिन्या, मीटर उघड्यावर असल्याचे दिसले. महिला शौचालयाची पाहणी करत स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. प्रत्येक विभागात फायलींचे गठ्ठे दिसून आले. टेबल, खुर्ची, कपाटावर गठ्ठे दिसत असल्याने नाराजी व्यक्त केली.

यातील अभिलेखांचे वर्गीकरण झाले आहे का, अशी विचारणा करत वर्गीकरण तत्काळ करावे, फायलींचे गठ्ठे एका ठिकाणी व्यवस्थित ठेवावे, अशा सूचना केल्या. मुदतबाह्य लेखांचे नाशन दोन दिवसांत करावे, अभिलेखांसाठी केलेल्या स्वतंत्र कक्षाची पाहणी त्यांनी केली.

वर्गीकरणाचा साप्ताहिक आढावा घेण्याचे आदेश देत अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, प्रशांत मेतकर, जिल्हा कृषी अधिकारी कैलास शिरसाट, डॉ. हर्षल नेहते आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अनावश्यक कपाटे हलवा

आरोग्य विभागातील पाहणीत श्रीमती मित्तल यांना कपाटांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. टेबल व कर्मचारी वर्गापेक्षा अधिक कपाट दिसल्याने त्यांनी विचारणा केली. कृषी, शिक्षण विभागातही हेच चित्र दिसल्याने सर्व अनावश्यक कपाटे हलविण्यात यावे, गरज असलेली कपाटे ठेवावे, ही संख्या तत्काळ कमी करावी, अशा सूचना केल्या.

काही विभागांमध्ये पुरेशा प्रकाश नसल्याने अंधार होता. यातच उपलब्ध लाइट, तसेच फॅन नसल्याने ज्या विभागांमध्ये लाइट व फॅनची आवश्यकता आहे तेथे बसविण्यात यावे, अशा सूचना केल्या. विभागांमध्ये तसेच इमारतीतील काही भागात विजेच्या तारा उघड्या, लटकलेली दिसत आहे. वीजमीटरदेखील उघड्यावर आहे, याबाबत विद्युतीकरणाचे बजेट सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

गळतीची पाहणी

मुख्यालयातील इमारतीची डागडुजी सुरू असतानाही गळती होत असल्याचे ‘सकाळ’ने वेळोवेळी निदर्शनास आणले होते. शिक्षण विभागात सुरू असलेली पाणीगळती, त्यातच कर्मचारी काम करत असल्याचे दाखविले होते.

श्रीमती मित्तल यांनी शिक्षण विभागात जाऊन गळतीची पाहणी करत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. टेरेसवर जाऊन तेथील पाण्याची टाक्यांची देखील पाहणी करत ही गळती तत्काळ रोखण्याचे निर्देश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT