Narendra Modi  esakal
नाशिक

National Youth Festival : 2 दिवस नेत्यांची मांदियाळी; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आज नाशिकमध्ये

राष्ट्रीय युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून या महोत्सवानिमित्ताने देशासह राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने नाशिक गजबजणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

National Youth Festival : राष्ट्रीय युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून या महोत्सवानिमित्ताने देशासह राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने नाशिक गजबजणार आहे.

गुरुवारी (ता.११) केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर हे नाशिकमध्ये दाखल होत आहेत. (2 days leaders in nashik city nashik news)

शुक्रवारी (ता.१२) मुख्य सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह राज्याचे मंत्रिमंडळ शहरात दाखल होत आहे.

नाशिकमध्ये प्रथमच होत असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घघाटन शुक्रवारी (ता.१२) पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दुपारी १२ वाजेला तपोवनातील साधुग्राम मैदानावर होत आहे. ५० हजार लोकांची आसन क्षमता असलेल्या या मैदानावर जर्मन तंत्रज्ञानावर आधारित कापडी मंडप उभारण्यात आला आहे.

२०० फूट रुंद आणि ८०० फूट लांब असलेल्या या भव्य मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. मुख्य व्यासपीठ हे ४० फूट रुंद आणि १०० फूट लांब आकाराचे बनवण्यात आले आहे. व्यासपीठावर निवडक व्यक्तींनाच प्रवेश राहणार असल्याने त्यांची नावे ठरवण्याचे काम सुरु आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे व क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु आहे. देशभरातून आलेल्या साडेसात हजार युवकांना पंतप्रधान काय संदेश देतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

काळाराम मंदिरात दर्शन, रोड शो

पंतप्रधान मोदी प्रथमच पंचवटीतील काळाराम मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. रामकुंड परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच छत्रपती संभाजी नगर रोडवरील मिर्ची चौक ते मोदी मैदानापर्यंत पंतप्रधानांचा रोड शो देखील होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT