Sub Inspector Dagle Caught by police esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : लाचखोर सागर डगळे यास 2 दिवसांची पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime: उपनगर पोलिस ठाण्यात दाखल अपहरणाच्या गुन्ह्याच्या तपासात वाहन आणि जेवणाच्या खर्चापोटी सात हजाराची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षकास जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

बुधवारी (ता.३) सायंकाळी जिल्हा रूग्णालय आवारात सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली होती. (2 days police custody for briber Sagar Dagle Nashik Bribe Crime news)

सागर गंगाराम डगळे (३८) असे कोठडी सुनावण्यात आलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. डगळे उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. नाशिक रोड परिसरातील तरुणावर प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्याचा तपास डगळे यांच्याकडे होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे येथे जावे लागणार असल्याचे सांगून डगळे यांनी संशयित तरुणाच्या भावाकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. वाहन आणि जेवणाच्या खर्चापोटी ही लाच मागण्यात आली होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तक्रारदाराने तीन हजाराची रक्कम ऑनलाइन यापूर्वीच दिली होती. उर्वरित रक्कम देण्याची ग्वाही देत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता. या घटनेची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी (ता. ३) सायंकाळी जिल्हा रूग्णालय आवारात सापळा लावून डगळे यास रंगेहाथ जेरबंद केले.

न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पथकाने संशयिताची घरझडती घेतली असून, त्यात अद्याप काही हाती लागले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT