Beating esakal
नाशिक

Nashik Crime News : बजरंग वाडीत 2 गटांत राडा; दंगलीचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बजरंगवाडीमध्ये वर्चस्वाच्या वादातून महादेव मंदिराजवळ दोन गटात तुफान हाणामारी झाली. सदर घटना बुधवारी (ता.१५) रात्री घडली. यात दोन युवक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात दोन्ही गटातील संशयितांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (2 groups fight in Bajrang Wadi Riot case registered Nashik Crime News)

पोलिस उपनिरीक्षक बाळू गिते यांच्या फिर्यादीनुसार, बजरंगवाडी परिसरात बुधवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली. परिसरातील वर्चस्वाच्या वादातून संशयित मंगेश हिरामण जाधव व संकेत ऊर्फ दाद्या तोरवणे यांच्यात संघर्ष सुरू होता.

मंगेश जाधव यास संकेत तोरवणे, चेतन जाधव, अभिषेक ब्राह्मणे, रोहन ऊर्फ मोनू शर्मा व त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली. या घटनेत मंगेश गंभीर जखमी झाला होता.

पोलिसांनी गर्दीला पांगविण्यास सुरवात केल्यानंतर दोन्ही गटातील संशयितांनी एकमेकांवर दगडफेक करीत मारहाण सुरू केली. यात विशाल सोमनाथ गाढवे जखमी झाला. विशालच्या डोक्यात संशयित संकेतने कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

मंगेश व विशालवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जमावाच्या दगडफेकीत स्थानिकांच्या घराचेही काही प्रमाणात नुकसान झाले. पोलिसांनी जमाव पांगवत संशयितांची धरपकड केली.

यात संकेत तोरवणे गटातील १४, तर मंगेश जाधव गटातील १३ संशयितांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT