Chhagan Bhujbal esakal
नाशिक

Nashik News: 10 बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी अडीच कोटी मंजूर; मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून चालना

सकाळ वृत्तसेवा

येवला : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील १० साठवण बंधाऱ्यांच्या दुरस्तीसाठी २ कोटी ४९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

बंधाऱ्यांच्या दुरुस्तीमुळे येवला मतदारसंघातील सिंचन क्षेत्रात वाढ होऊन शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. (2 half crore approved for repair of 10 dams Driven by efforts of Minister Chhagan Bhujbal Nashik News)

मतदारसंघात सिंचनाच्या अनेक योजनांची कामे सुरू असून, सिंचन क्षेत्रात अधिकाधिक वाढ करण्यासाठी मंत्री भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून येवला व निफाड तालुक्यातील एकूण १० बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी ४९ लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे.

लवकरच या कामांना सुरवात होणार आहे. हडप सावरगाव (ता. येवला) येथे पाझर तलाव दुरुस्ती करण्यासाठी ४३ लक्ष, मानोरी येथील सिमेंट कॉंक्रिट बंधारा दुरस्तीसाठी १८ लक्ष, विखरणी येथील पाझर तलाव दुरुस्तीसाठी ३५ लक्ष,

नेऊरगाव येथील पाझर तलाव दुरस्तीसाठी ३० लक्ष, कोळगाव २ येथील पाझर तलाव दुरुस्तीसाठी ४० लक्ष, एरंडगाव येथील सिमेंट बंधारा दुरस्तीसाठी १० लक्ष, बाभूळगाव येथील सिमेंट कॉंक्रिट बंधारा दुरस्तीसाठी १३ लक्ष,

अंदरसूल येथील बंधारा दुरुस्तीसाठी १० लक्ष, तर निफाड तालुक्यातील थेटाळे येथील आनंद सागर पाझर तलाव दुरुस्तीसाठी ४० लक्ष, विंचूर (ता. निफाड) येथील सोनवणे वस्ती येथे सिमेंट कॉंक्रिट बंधारा दुरुस्तीसाठी १० लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT