Due to the extra-Shravan mass and the Sunday holiday, the crowd of devotees surged in front of the Jyotirlinga temple esakal
नाशिक

Nashik: त्र्यंबकेश्‍वर दर्शनाच्या 200च्या पावतीसाठी 2 तास रांगेत! उत्तर महाद्वारसमोर रस्त्यामध्ये दुहेरी रांग

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील ज्योतिर्लिंग मंदिरातील दर्शनासाठीच्या दोनशे रुपयांच्या पावतीसाठी दोन तास रांगेत उभे रहावे लागते. सकाळी साडेसहाला मंदिराच्या उत्तर महाद्वाराच्यासमोर दुहेरी रांग तीही भरपावसात आबालवृद्धांना लावावी लागते.

उत्तर भारतीयांचा श्रावण मध्यावर आला असून पहाटेपासून भाविकांची शहरात वर्दळ सुरु होत आहे. (2 hours queue for 200 receipt of Trimbakeshwar darshan Double row in road in front of North Mahadwar Nashik)

मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या होणाऱ्या हालपेष्टा पाहवत नाहीत. अधिक-श्रावणामुळे स्नानासाठी राज्यातील भाविकांची कुशावर्त तीर्थासोबत दर्शनासाठी गर्दी उसळत आहे.

दर्शनासाठी पावती घेण्यासाठी लागणाऱ्या कालावधी इतका वेळ रांगेत प्रवेश केल्यावर दर्शनाला लागतो. पूर्व दरवाजाच्या रांगेतून सहा ते सात अथवा त्याहून अधिक वेळ दर्शनासाठी भाविकांना द्यावा लागत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशातच, महत्वाच्या-अति महत्वाच्या व्यक्ती कुटुंबियांसह दर्शनासाठी आल्यावर आमचे हाल कधी समजून घेणार अशी प्रतिक्रिया भाविक व्यक्त करतात.

भाविकांची चारचाकी वाहने रिंगरोडमध्ये पैसे घेऊन सोडण्यात येतात. त्यामुळे मंदिराचा परिसर धोकादायक नाही, असे जाहीर करणे बाकी असल्याचे स्थानिक रहिवाश्‍यांचे म्हणणे आहे. शिवाय इतर व्यवस्था त्र्यंबकराजाच्या भरवश्‍यावर असल्याची चर्चा शहरवासियांमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

Latest Marathi News Updates : वंजारा-बंजारा एक आहे, या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

SCROLL FOR NEXT