Accident esakal
नाशिक

Nashik Accident News : साकोऱ्यात कंटेनरच्या धडकेत 2 ठार; एक जखमी

कंटेनरला ओहरटेकच्या नादात मागच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरील तिघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला

सकाळ वृत्तसेवा

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील वेहळगाव रस्त्यावर रविवारी (ता.११) सायंकाळी कंटेनरला ओहरटेकच्या नादात मागच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरील तिघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. (2 killed in container collision in Sakora one injured Nashik Accident News)

रविवारी (ता. ११) सायंकाळी साडेसहाला साकोरा वेहळगाव रस्त्यावर नांदगावकडे जाणाऱ्या एसटी बसला चुकीच्या दिशेने दुचाकी चालकाने (एमएच ४१ बीजे ९९७८) ओव्हरटेक केले. याचवेळी पुढे जात असलेल्या कंटेनरला (एचआर ३८ एसी ६०५९) ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी कंटेनरच्या मागील चाकाखाली आली.

यात अतुल ज्ञानेश्वर पवार (३०), नितीन उत्तम पवार (३०) या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर योगेश सुदाम राठोड (२८) गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच नांदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.आर.बढे व त्यांच्या पथकाने अपघाताचा पंचनामा केला. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: पृथ्वी शॉ झाला महाराष्ट्राचा कर्णधार! ऋतुराज गायकवाडला संघात स्थान का नाही? पाहा संपूर्ण टीम

Satara Girl Death : सेकंदाच्या रागात उद्ध्वस्त झालं कुटुंब! साताऱ्यात शिक्षक बापानं 17 वर्षाच्या पोरीला क्रिकेटच्या बॅटनं संपवलं; मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

पुण्यातील 'या' ठिकाणी झालेलं माहेरची साडी सिनेमाचं शुटिंग, सिनेमातील घर आठवतय का? अजूनही गाजलेलं शूटिंग लोकेशन!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Kalika Mata Tradition: माते, काही चूक झाली असेल तर माफ कर’; येरोळमध्ये कालिका मातेला गावात आणण्यासाठी अनोखी परंपरा, नेमकी काय आहे परंपरा?

SCROLL FOR NEXT