PM Matru Vandana Yojana esakal
नाशिक

PM Matru Vandana Yojana : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत 2 लाख महिलांना अर्थसहाय्य!

सकाळ वृत्तसेवा

PM Matrutva Vandana Yojana : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेमार्फत जिल्ह्यात दोन लाख २० हजार मातांना अर्थसहाय्य देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत गरोदर महिलांना सहा हजार रुपयांची मदत दिली जाते.

लाभार्थींमध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक ५० हजार ४३१ मातांचा समावेश आहे. त्याखालोखाल निफाड तालुक्यातील १७ हजार ५५०, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील १६ हजार ८४८ मातांचा समावेश आहे. (2 Lakh Women Funded in Pradhan Mantri Matrutva Vandana Yojana nashik news)

महिला आणि बाल विकास मंत्रालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनेत महिलांना हप्त्यांमध्ये पाच हजार रूपये दिले जातात. पात्र महिला जननी सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थी असल्यास तिला अतिरिक्त एक हजार रुपये म्हणजेच एकूण सहा हजार रुपये दिले जातात.

यासाठी अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन अर्ज करता येतो. ही रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात वर्ग केली जाते.

याचा पहिला हप्ता अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपये, दुसरा हप्ता हा गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर २ हजार रुपये, तर तिसरा हप्ता हा पाल्याच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी २ हजार रुपये दिला जातो.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

तालुकानिहाय लाभार्थी

बागलाण- १३ हजार १२०, चांदवड- ८ हजार २५९, देवळा- ६ हजार ५५३, दिंडोरी- १२ हजार ७, इगतपुरी- ९ हजार ८६२, कळवण- ९ हजार ९९, मालेगाव- १३ हजार ६७९, नांदगाव- ७ हजार ८५०, नाशिक- १० हजार ३०८, निफाड- १७ हजार ५५०, पेठ- ५ हजार ३०२, सिन्नर- ११ हजार ६५३, सुरगाणा- ८ हजार ८, त्र्यंबकेश्‍वर- ८ हजार ९१७, येवला- ८ हजार ३२१, सिन्नर शहर- ९११, देवळाली शहर- ८४६, मनमाड- २ हजार २५२, मालेगाव महापालिका- १६ हजार ८४८.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Meeting: ओबीसी उपसमिती सर्व कुणबी प्रमाणपत्रांचा अभ्यास करणार; भुजबळांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले पुरावे

Uddhav Thackeray: आता मी पुन्हा येईन, पुन्हा येईन नाहीतर मी नेहमी येईन... देवेंद्र फडणविसांना टोला लगावत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Velhe Accident : वेल्हे चेलाडी रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी; रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अडीच महिन्यात गेला दुसरा बळी

Jalgaon News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या वेतनातून वसूल होणार रक्कम; एमपीडीए कारवाईतील त्रुटी जळगाव प्रशासनाला पडल्या महागात

Samsung Galaxy Z Fold 6 स्मार्टफोनवर चक्क 50 हजारचा डिस्काउंट, किंमत झाली निम्म्यापेक्षा कमी, ऑफर पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT