drowing in river basin esakal
नाशिक

नांदगाव तालुक्यातील खारी नदीपात्रात तिघे बुडाले

सकाळ वृत्तसेवा

बोलठाण (नाशिक) : बैलगाडीतून घरी परतत असताना नांदगाव तालुक्यातील मराठवाड्याच्या हद्दीतील जातेगाव येथील बाळू डोळस यांच्या शेतालगत खारी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात बैलगाडी उलटल्याने आठ जण बुडाले. पैकी पाच जणांनी आपला जीव वाचविला. मात्र, तिघे वाहून गेले. तिघांपैकी दोघांचे मृतदेह सापडले असून, पूजा सोनवणे या तिसऱ्या बेपत्ता मुलीचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध सुरूच होता.

औरंगाबाद व नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने जीव सुरक्षा दलाची शोध कार्यासाठी मदत घेतली आहे. पथकातील जवानांनी नदीपात्र पिंजून काढले. घटनेत मृत पावलेल्या मिनाबाई दिलीप बहिरव (वय ४५) व साक्षी अनिल सोनवणे (वय ११, रा. आडगाव) यांच्यावर आज (ता. २५) त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. तर पंधरा वर्षीय पूजा दिनकर सोनवणे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. शुक्रवार (ता. २४) पासून तिचा शोध घेण्याचे काम सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. सायंकाळी उशिरापर्यंत थांगपत्ता न लागल्याने रविवारी पुन्हा शोधमोहिम राबविण्यात येणार आहे.

जातेगाव शिवारात आडगाव (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील शेतकरी शेतीकाम आटोपून घराकडे निघाले असता रस्त्यातील खारी नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडी उलटून मिनाबाई दिलीप बहिरव व साक्षी अनिल सोनवणे यांचा मृत्यू झाला. तर पूजा सोनवणे हिचा शोध सुरू आहे.बैलगाडीतील उषाबाई दिनकर सोनवणे, ज्योतीबाई वाल्मिक सोनवणे, विकास दिलीप बहिरव, कोमल विकास बहिरव, समीक्षा अनिल सोनवणे हे पाच जण सुखरूप वाचले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT