नाशिक

Sakal Exclusive : नाशिक तालुक्याला 2 स्वतंत्र तहसील; शासनाकडे प्रस्ताव सादर

विनोद बेदरकर

Sakal Exclusive : नाशिक तहसील कार्यालयावर कामकाजाचा ताण आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करता तहसीलचे विभाजन करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी नवीन प्रस्तावित अप्पर तहसील सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला.

जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्राचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या नाशिक तालुक्यात महापालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, भगूर नगरपालिकेसह जिल्हा परिषदेच्या चार गटांचा समावेश होतो. लोकसंख्या आणि राजशिष्टाचारासह प्रशासकीय व्यापाच्या तुलनेत सध्याचे मनुष्यबळ अपुरे पडते. (2 separate tehsil office in Nashik taluka news)

त्यामुळे तहसील कार्यालयाचे विभाजन करून वाढीव मनुष्यबळासह नवीन अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे करण्यात आला आहे. प्रस्तावित अप्पर तहसील करताना त्यासाठीची भौगोलिक रचना मात्र फार सोयीची नाही. आर्थिक पातळीवरील अधिकार, नव्या प्रस्तावित रचनेत ग्रामीण नागरिकांना अधिकच्या फेऱ्या मारण्याचा त्रास होण्याची शक्यता आहे

असे असेल अप्पर तहसील

नव्याने प्रस्तावित अप्पर तहसील कार्यक्षेत्रात पंचवटी, तपोवन, शहर, इंदिरानगर, सिडको, सातपूर, गंगापूर, आनंदवली, पिंपळगाव बहुला, कामटवाडे, देवळाली, देवळाली एक, देवळाली दोन, विहितगाव, दसक, पंचक, बेलतगव्हाण, संसरी, नाणेगाव, याशिवाय महिरावणी, दुडगाव, विल्होळी, पिंपळद, सारूळ, राजूर बहुला, रायगडनगर, जातेगाव, दहेगाव, तळेगाव अंजनेरी, बेलगाव ढगा, तिरडशेत, वासाळी, गणेशगाव (नाशिक), गणेशगाव (त्र्यंबकेश्वर), पिंपळगाव, गौळाणे आणि आंबेबहुला अशा ३० सज्जे आणि ७५ गावांचा समावेश सुचविला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नवीन पदनिर्मिती

नव्याने होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयासाठी एक अप्पर तहसीलदार, दोन नायब तहसीलदार, चार अव्वल कारकून, सहा लिपिक, एक वाहनचालक अशा १४ कर्मचाऱ्यांची मागणी नोंदविली आहे. सुमारे ९४ लाख रुपये वार्षिक वेतन, पाच लाख आवर्ती, तर २५ लाख अनावर्ती खर्चाची मागणी नोंदविण्यात आली आहे.

गैरसोय अधिक

नव्या तहसिलात देवळालीतील दसक-पंचकपासून संसरीपर्यंतचा भाग सुचविला असताना लगतचा एकलहरे, शिंदे-पळसेसह अनेक भाग वगळले आहेत. संसरी, नाणेगाव, बेलतगव्हाणचे नागरिक एका कार्यालयात येतील. दसक-पंचकलगतच्या एकलहरेसह विविध भागांतील नागरिकांना मात्र दुसऱ्या तहसीलमध्ये जावे लागेल.

गोवर्धन, गिरणारे, आडगाव, गंगाम्हाळुंगीसह अनेक भाग जुन्या तहसीलमध्ये असतील; तर त्याचवेळी गिरणारेलगतच्या त्र्यंबक रोडवरील गावे मात्र नव्या तहसीलमध्ये असतील. गरीब आणि श्रीमंत तहसील अशा चित्रातून नागरिकांच्या चकरा कायमच राहतील. त्यामुळे ज्यांच्यासाठी कार्यालये करणार आहेत, त्यांना काय वाटते हे जाणून घेण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT