Thief esakal
नाशिक

Nashik Crime: सराफ बाजारात तपासासाठी आणलेले संशयित बेड्यांमधून हात सोडवून फरारी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : महाड पोलिसांनी नाशिकच्या सराफ बाजारात तपासासाठी आणलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयितांनी बेड्यांमधून हात सोडून घेत पळ काढल्याची घटना बुधवारी (ता. १५) गंगाघाटावरील खंडेराव मंदिरासमोरील पार्किंगमध्ये घडली.

या घटनेने महाड पोलिसांसह पंचवटी पोलिसांची धावपळ उडाली. मात्र, पळून गेलेले संशयित हाती न लागल्याने पंचवटी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (2 suspects who were bought for investigation in Saraf Bazar absconded nashik crime news )

राहुल कांतराज पवार (वय १९, रा. मौजे डोमेगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), योगेश नबीलाल काळे, (२८, रा. कुंबरगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. दोन संशयित जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्यातील आहेत. योगेश काळे यास चांदवड न्यायालयाच्या परवानगीने नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले होते.

त्याच्यावर महाड शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी राहुल पवारला अटक केली होती. तपासात राहुलने योगेश काळे या मित्रासह गुन्हा केल्याची कबुली दिली. काळे हा मनमाड पोलिसांत दाखल गुन्ह्यात अटक होऊन न्यायालयीन कोठडीत होता.

आरोपींनी नाशिक येथील सराफ बाजारातील एका सोने व्यापाऱ्याकडे चोरीचे दागिने विकल्याची माहिती समोर आल्याने महाड पोलिस तपासासाठी नाशिकला आले होते. पोलिसांनी योगेश काळे यास मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले. योगेश व राहुल यांना घेऊन पोलिस पथक चारचाकी (एमएच ०६ बीएम ६६५४) वाहनाने गोदाघाटावरील गौरी पटांगण येथे आले.

त्या वेळी गाडीच्या मागच्या सीटवर बसलेल्या दोघांना चौकशीसाठी सराफ बाजारात घेऊन जाताना पोलिस नाईक गोतपगार यांची नजर चुकवून दोघांनी हातातील बेड्या सोडवून वाहनातून खाली उतरून पळ काढला. गोतपगार यांनी पाठलाग केला; परंतु दोघेही हाती लागले नाहीत. गोतपगार यांनी सराफ बाजारात गेलेल्या पोलिस पथकाला माहिती देऊन घटनास्थळी बोलावले. त्यानंतर गोदाघाट, नाशिक रोड रेल्वेस्थानक परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT