sanjay gandhi niradhar yojana esakal
नाशिक

संजय गांधी निराधार योजनेचे नाशिक जिल्ह्यात 2 हजार बोगस लाभार्थी

या बोगस लाभार्थ्यांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत २ हजार बोगस लाभार्थी आढळून आले आहेत. या बोगस लाभार्थ्यांची संख्या अजून वाढण्याची शक्यता असून त्यांच्यावर आता कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी प्रशासनास दिली आहे. या लाभार्थ्यांकडून आता पैसे वसुल करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे राहिले आहे.

शासनातर्फे या योजनेतंर्गत ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा यासह अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत आर्थिक मदत हजार रुपये दर महिन्याला देण्यात येत असते. त्यामुळे गोरगरिब व निराधारासाठी ही योजना अतिशय कल्याणकारी ठरली आहे.

जिल्ह्यात या योजनेचे सुमारे २ लाख २० हजार लाभार्थी आहे. मात्र यामध्ये अनेक बोगस व्यक्तींना या योजनेचा लाभ होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एका सॉफ्टवेअरच्या मदतीने लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये जिल्ह्यात दोन हजार बोगस लाभार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात अजून लाभार्थ्यांची तपासणी सुरु असून बोगस लाभार्थी यांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.

आतापर्यंत झालेल्या तपासणीमध्ये जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात अंदोज ५००, दिंडोरीत ३५०, नाशिक (तालुका) २१, मालेगाव ३५०, बागलाणमध्ये १३८ बोगस लाभार्थी प्रशासनास आढळून आले आहे. असून इतर तालुक्यांची तपासणी तहसिलदारांच्या मदतीने केली जात आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून या प्रकरणात दोषींवर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT