Bribe Case News esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: सातबाऱ्यावर नावनोंदणीसाठी मागितली 2 हजारांची लाच; त्र्यंबकच्या तलाठी, कोतवालास रंगेहाथ अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : जमीन खरेदी केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नावनोंदणी करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी त्र्यंबकेश्‍वरचा तलाठी व कोतवालाला रंगेहाथ अटक करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदरची कारवाई बुधवारी (ता. ५) केली. (2 thousand bribe demanded for enrollment on Saturday Trimbakeshwar Talathi Kotwala arrested red handed by acb Nashik bribe Crime)

तलाठी संतोष शशिकांत जोशी (47, रा. त्र्यंबकेश्वर), कोतवाल रतन सोनाजी भालेराव (51) असे लाचखोरांचे नाव आहे. ३८ वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांनी जमीन खरेदी केली होती.

जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नावनोंदणी करून दिल्याच्या मोबदल्यात लाचखोर तलाठी जोशी व कोतवाल भालेराव यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, पथकाने पडताळणी केल्यानंतर बुधवारी (ता.५) सापळा रचला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार तलाठी कार्यालयात लाचखोरांनी पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारल्याने दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी त्र्यंबकेश्‍वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई लाचलुचपतच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, प्रवीण महाजन, नितीन कराड, प्रमोद चव्हाणके, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT