death esakal
नाशिक

Nashik News : दुचाकी झाडावर आदळून दोघे ठार; गंगापूर रोडवरील घटना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आनंदवल्लीकडून जेहान सर्कलकडे जात असताना गंगापूर रोडवरील झाडावर आदळून दुचाकीस्वारासह एक ठार तर तिसरा तरुण जखमी (Injured) झाल्याची घटना घडली. (2 wheeler hit to tree two persons died at gangapur road nashik news)

भरत जसबीर रोकाया (क्षत्रिय) (१९), पंकज रावल (२७) असे मयत दोघांची नावे आहेत. नवीन हेमराज क्षत्रिय (रा.आदित्य अपार्टमेंट, जेहान सर्कल) जखमी झाले.

नवीन हेमराज क्षत्रिय (रा. आदित्य अपार्टमेंट, जेहान सर्कल) या तरुणाच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता.१८) रात्री साडेबारा वाजता भरत हा पंकज रावल व नवीन क्षत्रिय यांना नवीन दुचाकीवरून (एमएच १५ इजी ७९७७) ट्रिपल सीट बसवून आनंदवलीकडून जेहान सर्कलकडे जात होता.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

त्यावेळी सावरकर नगर बसस्टॉपजवळ दुचाकीवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातामध्ये भरत जागीच ठार झाला तर पंकजच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली.

त्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तर दुचाकीवर बसलेल्या नवीनच्या मांडीचे हाड मोडले. भरतविरोधात गंगापूर पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला आला आहे. उपनिरीक्षक भिसे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT