crime esakal
नाशिक

Nashik Crime News : कुरकुरे घेण्याच्या बहाण्याने येत 20 ग्रॅमची सोनपोत ओरबाडली

सायंकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी काळया रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट व दुसरा गुलाबी रंगाचा शर्ट व काळया रंगाची पॅन्ट घातलेले असे दोन युवक दुचाकीवरून दुकानाजवळ आले अन...

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहराच्या चौगाव रोड नववसाहतीतील गणपतनगरमधील किराणा दुकानात कुरकुरे घेण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी एका महिलेची ६० हजार रुपये किमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून पोबारा घडल्याने शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. (20 grams of gold was stolen on the pretext of buying packaged snacks Nashik Crime News)

दत्तात्रेय पवार यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह यासाठी शहराच्या चौगाव रोड नववसाहतीतील गणपतनगरमध्ये दत्तकृपा प्रोव्हिजन अँड जनरल स्टोअर्स या नावाचे दुकान सुरू केले आहे. सायंकाळी सातच्या सुमारास गणपतनगर येथे श्रीराम रथाच्या पालखीची मिरवणूक येणार होती.

याचवेळी दत्तात्रेय पवार हे दुकानातील काही सामान घेण्यासाठी शहरात गेले असता त्यांनी पत्नी तारामती दत्तात्रेय पवार यांना दुकानात थांबायला सांगितले. सायंकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी काळया रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट व दुसरा गुलाबी रंगाचा शर्ट व काळया रंगाची पॅन्ट घातलेले असे दोन युवक दुचाकीवरून दुकानाजवळ आले.

त्यातील एक जण दुचाकीवर बसून होता तर पाठीमागे बसलेला एक जण दुकानात आला व शंभर रुपये देऊन त्याने वीस रुपयांचे कुरकुरे विकत घेतले. त्यानंतर त्याने पुन्हा दहा रुपयाचे कुरकुरे विकत घेऊन निघून गेला.

काही वेळानंतर तारामती पवार यांना लक्षात आले, की आपल्या गळ्यातील वीस ग्रॅम सोन्याची ६० हजार रुपये किमतीची पोत गायब झाली आहे.

तेव्हा त्यांची खात्री झाली, की दुकानात कुरकुरे घेण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन चोरट्यांनी हातचालाखी करून तारामती पवार यांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरली. याबाबत पवार यांनी सटाणा पोलिस ठाण्यात दोन चोरट्यांविरोधात फिर्याद दिली असून पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT