corona patient esakal
नाशिक

Nashik : आणखी 20 पॉझिटिव्‍ह; जिल्‍ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या 71 वर

अरूण मलाणी

नाशिक : सलग दुसऱ्या दिवशी जिल्‍ह्यात नव्‍याने आढळलेल्‍या कोरोनाबाधितांची (Corona Patients) संख्या दोन आकडी राहिली. शुक्रवारी (ता. १०) दिवसभरात २० रुग्‍णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्‍ह (Positive) आले. यामुळे ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या अठराने वाढली असून, सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ७१ झाली आहे. दरम्यान, दोन रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. (20 more positives number of active patients in district 71 Nashik Corona Update News)

जिल्‍ह्यात कोरोना फैलावाच्‍या केंद्रस्‍थानी नाशिक महापालिका क्षेत्र राहात आहे. शुक्रवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील १४ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले. नाशिक ग्रामीण भागातील तीन, मालेगाव महापालिका क्षेत्र एक, तर जिल्‍हाबाहेरील दोघांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले. दोन रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केल्‍याचे अहवालात नमूद केले आहे. कोरोनामुळे होणाऱ्या निधनाचे प्रमाण थांबल्‍याची मात्र दिलासादायक बाब आहे. प्रलंबित अहवालांची संख्या वाढू लागली असून, सायंकाळी उशिरापर्यंत २०२ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्र ४२, नाशिक ग्रामीण भागात १३९ व मालेगाव महापालिका क्षेत्रातील २१ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा आहे.

ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येची स्‍थिती अशी

नाशिक महापालिका क्षेत्र : 51

नाशिक ग्रामीण क्षेत्र : 10

मालेगाव महापालिका क्षेत्र : 4

जिल्‍हाबाहेरील : 6

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाची उघडीप; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा ताजा अंदाज जारी

Friendship Story: रक्ताच्या नात्यांपेक्षाही मैत्री श्रेष्ठ! देश-विदेशातून 54 डॉक्टर मित्र एकवटले; दिवंगत मित्राच्या कुटुंबासाठी 18 लाख जमवले

ENG vs PAK: इंग्लंडसमोर पाकिस्तानचे लोटांगण! जो रुटच्या संघाचा लॉर्ड्सवर दणदणीत विजय, WTC Points Table मध्येही फायदा

Marathi News Live Updates : 'वसुधैव कुटुंबकम्'चा विचार स्वीकारा; इतरांची सेवा करणे हे आपले कर्तव्य - मोहन भागवत

EL NINO IMPACT : 'सुपर एल निनो'चा भारतावर काय होणार परिणाम? गेल्या 7 दशकांतील सर्वात तीव्र हवामान बदलाचा इशारा; देशात माॅन्सूनचा पाऊस 14 टक्के कमी!

SCROLL FOR NEXT