Corona esakal
नाशिक

नाशिक : शहरात नवे 20 कोरोना रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात कोरोना (Corona) उद्रेक पुन्हा वाढू लागला आहे. शुक्रवारी (ता. १७) शहरात वेगवेगळ्या भागात २० कोरोना बाधित रुग्ण (Corona Patients) सापडले. त्यामुळे महापालिका (NMC) वैद्यकीय विभाग पुन्हा सतर्क झाला आहे. सायंकाळी तातडीने शहरातील सगळ्या रुग्णालयांना मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पत्र देत कोरोना रुग्णांबाबत हलगर्जीपणा न करता त्वरित माहिती कळविण्याच्या सूचना केल्या. (20 new corona patients in city Nashik Corona Update News)

शहरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी शहरात ५२४ रुग्णांची तपासणी केल्यानंतर २० जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यापैकी एक जण महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे सायंकाळनंतर महापालिका वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी शहरातील सगळ्या रुग्णालयांना पत्र देत कोरोना रुग्ण सापडल्यास त्वरित महापालिकेला कळविण्यासह खासगी रक्त लॅबकडून आयसीएमआर पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे, तसेच कोरोना तपासणीत पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांची माहिती तातडीने कळविण्यासाठी आवाहन केले.

"कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. वाढत्या गर्दीत काळजी घ्यावी. मास्कचा वापर करावा. रुग्णांची संख्या वाढल्याने शासनाला प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागू नयेत, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी."

- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT