Court Order esakal
नाशिक

Nashik Crime : ब्लॅकमेल, अत्याचार प्रकरणी एकाला 20 वर्षे सक्तमजुरी!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अल्पवयीन पीडितेला प्रेमसंबंध उघड करण्याची धमकी देत तब्बल नऊ महिने अत्याचार व मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटिंग करून ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. संतोष भाऊसाहेब टिळे (२८, रा. चौधरी बिल्डर्सजवळ, पळसे, नाशिकरोड) असे आरोपीचे नाव असून, ही घटना २०१७ मध्ये घडली होती. (20 years hard labor for one in case of blackmail torture Nashik Latest Crime News)

पीडितेचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध होते. ही बाब उघड करण्याची धमकी देत, संतोषने एप्रिल २०१७ मध्ये पीडिता दुपारी एकटीच घरी असताना तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर संतोषने तिच्यावर पाथर्डी फाटा येथील सेलिब्रेशन लॉज, चेहेडी पंपीग, संगमेश्वरनगर, वाह नाशिक लॉज, त्र्यंबकेश्वर व पीडितेच्या घरी तब्बल नऊ महिने लैंगिक अत्याचार केले. यावेळी संतोषने मोबाईलमध्ये अत्याचाराचे व्हिडीओ शुटींग केले. हेच व्हिडीओ व अर्धनग्न फोटो इतरांना दाखविण्याची तसेच इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी देत तिला मारहाण करून लैंगिक अत्याचार केले.

पिडितेने नाशिकरोड पोलिस ठाण्यात संतोषविरोधात फिर्याद दिली होती. नाशिक रोडचे तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी गुन्ह्याचा तपास करुन आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे वकील दीपशिखा भिडे यांनी साक्षीदार तपासले. अतिरिक्त सत्र न्या. मृदुला भाटीया यांनी साक्ष, फिर्याद व पुराव्यांच्या आधारे संतोष यास २० वर्षे सश्रम कारावास व २० हजारांचा दंड ठोठावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT