wheat Floar export esakal
नाशिक

Russia- Ukrainमधील संघर्षामुळे भारतातून गहू पिठाच्या निर्यातीत 200 टक्के वाढ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रशिया आणि युक्रेनमधून गव्हाची निर्यात जगाच्या व्यापारापैकी एक चतुर्थांश होते. पण आताच्या दोन्ही देशातील संघर्षामुळे जागतिक गहू पुरवठा साखळी विस्कळित झाल्याने भारतीय गव्हाची मागणी वाढली आणि देशांतर्गत गव्हाचे भाव वाढले.

त्यामुळे मेमध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. अशातच, गव्हाच्या पिठाची निर्यात एप्रिल ते जुलै २०२२ मध्ये २०२१ मधील एप्रिल ते जुलैच्या तुलनेत २०० टक्क्यांनी अधिक झाली. त्यामुळे आता गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर निर्बंध घातले जाणार आहेत. (200 percent increase in wheat flour export from India due to Russia Ukraine conflict Nashik latest marathi news)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत गहू अथवा पिठाला निर्यात निर्बंध अथवा बंदीतून वगळणाऱ्या धोरणात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाले. त्यामुळे गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर निर्बंध घालणे शक्य होणार आहे.

यासंबंधाने परराष्ट्र व्यापार महासंचालनालयातर्फे अधिसूचना जारी होणार आहे. गव्हाच्या पिठाच्या वाढत्या किमतींना आळा घालत अन्न सुरक्षा निश्‍चित करण्याचा हेतू असल्याचे केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये गव्हाच्या पिठाला वाढत असलेल्या मागणीचा परिणाम म्हणजे, देशांतर्गत गव्हाच्या पिठाचे दर वाढले आहेत. यापूर्वी गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर बंदी अथवा निर्बंध न आणण्याचे धोरण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT