Employees of Municipal Sanitation Department cleaning the site of Shiva Mahapuran story. esakal
नाशिक

Maha Shiv Puran Katha: शिवपुराण कथेच्या जागेवरील 21 टन कचरा संकलित

सकाळ वृत्तसेवा

सिडको : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये शिवमहापुराणनिमित्ताने आध्यात्मिक पर्वणी भाविकांना लाभली होती. अशावेळी तेथील स्वच्छता राखण्याचे काम महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने पार पाडण्यात आले. (21 tonnes of garbage collected from the site of Shiv Puran Katha nashik)

महापालिका सिडको विभागीय कार्यालय स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवून आजतागायत तब्बल २१ टन कचरा संकलित करण्यात आला आहे. एकूण नऊ दिवसांमध्ये मनपा सिडको स्वच्छता विभागाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली.

तब्बल ४० ते ४५ घंटागाड्यांचा वापर करण्यात आला. याकरिता एकूण ५० स्वच्छता कर्मचाऱ्यांचा समावेश होता. एकूण दोन सत्रांत हे काम सुरू होते. त्यामध्ये दोन स्वच्छता निरीक्षक, सुपरवायझर आणि कर्मचारी यांच्यामार्फत साफसफाई करण्यात आली.

"शिवमहापुराण कथेला लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. अशावेळी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा होता. याकरिता आम्ही स्वच्छता व नीटनेटकेपणा ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यास आम्हाला यश मिळाले." - संजय गांगुर्डे,स्वच्छता अधिकारी, मनपा, सिडको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Dutt: अजय देवगन संजय दत्तचा फॅमिली डॉक्टर? संजय दत्तचे हैराण करणारे खुलासे

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Latest Marathi News Live Updates: इगतपुरी रेल्वे स्थानकावर आदिवासी सेनेचे संस्थापक दि.ना.उघाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT