नाशिक

नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

CD
फोटो : 34498 नंदुरबार : पदयात्रेच्या प्रारंभप्रसंगी आमदार डॉ. विजयकुमार गावित, डॉ. सुप्रिया गावित, हिरालाल चौधरी आदी. ------------ नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा आमदार डॉ. गावितांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी नवस नंदुरबार, ता. ५ : आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी केलेला नवस फेडण्यासाठी कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या सहभागातून नंदुरबार ते नाशिंदा अशी २२ किलोमिटरची पदयात्रा काढण्यात आली. माजी आदिवासी विकासमंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी नंदुरबार तालुक्यातील नाशिंदा येथील पावबा ऋषी येथे नवस करण्यात आला होता. आमदार डॉ. गावितांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर नवसपूर्तीसाठी नंदुरबार ते नाशिंदा येथील पावबा ऋषी महाराज तीर्थक्षेत्रापर्यंत २२ किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा नंदुरबारातून उमर्दे खुर्द, वडवद, भालेर, काकर्देमार्ग नाशिंदा येथे पोहोचली. पावबा ऋषींच्या मंदिरात आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी पत्नी डॉ. कुमुदिनी गावित, कन्या डॉ. सुप्रिया गावित यांच्यासमवेत विधिवत पूजन करून महाआरती केली. ही पदयात्रा माजी खासदार डॉ. हीना गावित यांच्या मार्गदर्शनात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या उपस्थितीत झाली. पदयात्रेत माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील, पालिकेतील विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, नगरसेवक पंकज चौधरी, माजी नगरसेवक प्रकाश भोई, आकाश चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य शोभा पाटील, प्रवीण पाटील, होळतर्फे रनाळेचे सरपंच व्यंकट पाटील, बलवंडचे सरपंच संजय पाटील, भालेरचे चंद्रशेखर पाटील, भिका पाटील, रमेश पाटील, माजी उपसरपंच डॉ. मनोज पाटील, कंढरेचे सरपंच लोटन पाटील, सुपडू पाटील आदी सहभागी झाले होते. पदयात्रेचे भालेर, काकर्दे, नाशिंदा येथे स्वागत करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital Payments: ऐन दिवाळीत Google Pay डाऊन? ऑनलाइन पेमेंट करताना अनेकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

Maharashtra Drought Relief : ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजारांची मदत - फडणवीसांची माहिती; उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : घाबरायचे नसते, त्यांच्यात घुसून कार्यक्रम करायचा असतो - गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला

SCROLL FOR NEXT