corona virus test esakal
नाशिक

नाशिक जिल्‍ह्‍याने गाठला 22 लाख चाचण्यांचा टप्पा

अरुण मलाणी

नाशिक : दर दिवशी आढळणाऱ्या कोरोना बाधितांची (Corona positive) संख्या कमी येत असल्‍याने, चाचण्यांचे (corona virus test) प्रमाण तर घटले नाही ना, असा प्रश्‍न अनेकांना पडू शकतो. परंतु दैनंदिन अहवालाचे विश्‍लेषण केल्‍यास असे काहीही नसल्‍याचे स्‍पष्ट होते. विशेषतः दुसऱ्या लाटेनंतर (Second wave) दैनंदिन स्‍वॅब (Swab) चाचण्यांच्‍या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे. रविवारी (ता.२५) जिल्‍ह्‍याने २२ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला असून, यावेळी पॉझिटिव्‍हीटी दर (Positivity rate) १८.२५ टक्‍के राहिला आहे. (22-lakh-corona-test-in-nashik-district-marathi-news)

दैनंदिन चाचण्यांच्‍या प्रमाणात लक्षणीय वाढ

नाशिक जिल्‍ह्‍यात लासलगावला गेल्‍या वर्षी २९ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्‍ण आढळला होता. यानंतर संबंधिताच्‍या संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या स्‍वॅब चाचणीसह यानंतर आढळणाऱ्या संशयित रुग्‍णांची स्‍वॅब चाचणी करण्यात आली. सुमारे साडे तीन महिन्‍यांनंतर १७ ऑगस्‍ट २०२० ला जिल्‍ह्‍यात एक लाख चाचण्यांचा टप्पा गाठला. पहिल्‍या लाटेत तुलनेने चाचण्यांचे प्रमाण मर्यादित राहिले. परंतु दुसऱ्या लाटेत व विशेषतः यावर्षी एप्रिल-मे महिन्‍यात दैनंदिन चाचण्यांच्‍या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. रोजच्‍या वीस हजाराहून अधिक चाचण्या या कालावधीत केल्‍या जात असल्‍याचे जिल्‍हा रुग्‍णालयातर्फे जारी केलेल्‍या अहवालातून स्‍पष्ट होते.

निर्बंध शिथिलतेसाठी ठरतेय फायदेशीर

शासनाने अनलॉक (Unlock) प्रक्रियेत निर्बंध शिथिल करतांना प्रामुख्याने पॉझिटिव्‍हीटी रेटचा आधार घेतला आहे. नाशिक जिल्‍ह्‍यात चाचण्यांचे प्रमाण समाधानकारक असल्‍याने सहाजिकच पॉझिटिव्‍हीटी रेट कमी झालेला आहे. यातून निर्बंध शिथिलतेसाठी वाढीव चाचण्यांचा अप्रत्‍यक्षपणे फायदा होतो आहे.

जिल्‍ह्‍यात चाचण्यांचे महत्त्वाचे टप्पे-

दिनांक चाचण्यांची संख्या पॉझिटिव्‍हीटी रेट
१७ ऑगस्‍ट २० १ लाख २४.८९
१५ सप्‍टेंबर २० २ लाख २७.८९
११ डिसेंबर २० ४ लाख २६.१८
१ फेब्रुवारी २१ ५ लाख २३.१८
१९ एप्रिल २१ १० लाख २६.५७
२१ मे २१ १५ लाख २४.९८
३ जुलै २१ २० लाख १९.७३
२५ जुलै २१ २२ लाख १८.२५

(22-lakh-corona-test-in-nashik-district-marathi-news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

SCROLL FOR NEXT