Nashik Municipal Corporation esakal
नाशिक

नाशिक महापालिकेत २२ अधिकारी वाहनाविना

महापालिकेतील २२ अधिकाऱ्यांना वाहन नसल्याने त्यांना स्वतःची वाहने वापरावी लागत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेतील २२ अधिकाऱ्यांना वाहन नसल्याने त्यांना स्वतःची वाहने वापरावी लागत आहेत. अपुरे वाहनचालक त्यामागचे कारण आहे. मात्र, असे असले तरी महापालिकेला स्वतःच्या वाहनापेक्षा अधिकाऱ्यांना खासगी वाहनापोटी ठराविक रक्कम देणे सोयीचे ठरते.

नाशिक महापालिकेचा स्वतःचा वाहनांचा ताफा आहे. आता त्यात चालकांची संख्या काही दिवसांपासून सातत्याने कमी होत आहे. महापालिकेच्या पथकात २१५ स्वतःची वाहने आहेत. ही वाहने चालविण्यासाठी मात्र महापालिकेकडे १३५ चालक आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या वाहनांपासून तर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या बंबाच्या चालकांच्या ड्यूट्यांचे नियोजन करावे लागते.

साधारण ७८ हून अधिक वाहनांबाबत असे नियोजन करावे लागते. सध्या प्रशासकीय राजवट लागू आहे. पदाधिकाऱ्यांची वाहने जमा केली आहेत. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनापुरता हा विषय मर्यादित राहिला आहे. मात्र, येत्या काही दिवसांत महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यास महापालिकेला निवडणूक तयारीचा भाग म्हणून वाहनांची सोय करावी लागणार आहे.

महापालिकेच्या स्वत:च्या वाहनांच्या इंधन देखभालीसाठी स्वत:ची वेगळी व्यवस्था उभारावी लागते. स्वतःचा डिझेलपंपही आहे. दोनशेहून अधिक वाहनांसाठी देखभालीसाठी स्वत:चा विभाग आहे. वार्षिक ४० लाखांच्या आसपास या विभागाचा खर्च आहे. नव्या व्यवस्थेत अधिकाऱ्यांकडून महापालिकेच्या वाहनाऐवजी स्वतःच्या वाहनाला पसंती देण्याच्या आग्रहामुळे महापालिकेला सोयीचे ठरत आहे.

वाहनाऐवजी वाहनभत्ता

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वाहनसेवा पुरविली जाते. मात्र, वाहन नसलेल्या साधारण २२ अधिकाऱ्यांना त्यांच्या वाहनापोटी महापालिकेकडून भत्ता दिला जातो. अधिकारी स्वत:चे वाहन वापरतात. त्यापोटी ठराविक रक्कम देण्यामुळे महापालिकेला आर्थिक पातळीवर हा विषय परवडतो, तर दुसरीकडे अधिकाऱ्यांना त्यांच्या वाहनाच्या वापरापोटी महापालिकेकडून केवळ भत्ता घेऊन कामकाज चालविणे सोयीचे होते. वाहनचालकाचा खर्च महापालिकेवर येत नाही आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या सोयीच्या आणि स्वत:च्या वाहनातून फिरत कामकाज करता येते व प्रायव्हसी जपता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

Uddhav Thackeray: ५ ऑक्टोबरचा पंचनाम्यांचा मुहूर्त कशासाठी? दुष्काळावरून उद्धव ठाकरे आक्रमक; महाराष्ट्र पिंजून काढण्याची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! ब्लॉकमुळे ४ लोकल रद्द, दोन दिवस कल्याण-कसारा सेवा बंद; रेल्वे वेळापत्रकात मोठे बदल

Marathi News Live Updates : राज्यात 20 ते 25 सप्टेंबरदरम्यान पुन्हा पावसाची शक्यता; हवामान विभागाने वर्तविला अंदाज

तिरडीवरचा अबीर गुलाल पाहून मी... अलका कुबल यांनी सांगितली 'माहेरची साडी'बद्दलची आठवण, म्हणाल्या- स्वतःचं मरण

SCROLL FOR NEXT