kisan railway esakal
नाशिक

किसान रेल : 9 बोगींची गाडी होणार तब्बल 23 बोगींची

विनोद बेदरकर

नाशिक : साधारण वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या देशातील पहिल्या किसान रेलला (kisan rail) जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून (farmers) भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नऊ बोगींची ही गाडी आता तब्बल २३ बोगींची होणार आहे. मनमाड येथून आठवड्यात सहावेळा, तर देवळाली कॅम्प व नाशिक रोड रेल्वेस्थानकाहून आठवड्यात तीन दिवस किसान रेल धावणार आहे. येत्या सोमवारी (ता. २३) खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते या स्पेशल किसान रेलचा देवळाली कॅम्प येथून प्रारंभ होणार आहे.

किसान रेल आता तब्बल २३ बोगींची

कृषिप्रधान नाशिक जिल्ह्यातील शेतीमाल रेल्वेमार्गाने इतर राज्यांत पोचावा, यासाठी खासदार गोडसे तीन वर्षांपासून प्रयत्नशील होते. वर्षभरापूर्वी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. तेव्हापासून आठवड्यातून एकदा देवळाली कॅम्प ते बिहारमधील दाणापूर या स्थानकांदरम्यान धावणारी देशातील पहिली किसान रेल सुरू झाली. त्यानंतर शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून, आठवड्यातून तीन दिवस किसान रेल सुरू करण्यात आली. या किसान रेलला नऊ बोगी असून, नाशिक, मनमाड आणि देवळाली कॅम्प या रेल्वेस्थानकासाठी प्रत्येकी दोन बोगी शेतीमाल वाहतुकीसाठी वापरात येतात.

यापुढे किसान रेलला २३ बोगी असतील. त्या माध्यमातून रोज जवळपास पाचशे टन शेतमाल परराज्यांत जाणार आहे. तसेच, सांगोला (जि. सोलापूर) येथून येणारी किसान रेल मनमाडमार्गे जाणार असल्याने मनमाड येथील शेतकऱ्यांना आठवड्यातून सहा दिवस या गाडीचा लाभ मिळणार आहे. २३ बोगींपैकी मनमाड, देवळाली कॅम्प आणि नाशिक रोडसाठी प्रत्येकी सहा बोगी शेतीमाल वाहतुकीसाठी मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SOORYAVANSHI: क्रिकेट सोडा, वैभवचा ‘हा’ व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क! वाघाच्या शोधात जंगलात पोहोचला ‘बेबी बॉस’, पण शेवटी...

Akola News : आ. साजिद खान पठाण यांची काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

Baramati News : बारामतीच्या अथर्व पवार यांची केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या परीक्षेत उत्तुंग कामगिरी

Kari Saeed Dies: भारताचा आणखी एक दहशतवादी शत्रू संपला! हाफिज सईदचा खास कमांडर कारी सईदचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

Pune Airport Security : वाढत्या बांधकामांमुळे हवाई सुरक्षेचे आव्हान वाढले; ना-हरकत प्रमाणपत्र घेणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT