msrtc latest marathi news esakal
नाशिक

तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी MSRTCतर्फे 230 बस

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : श्रावण महिन्‍याच्‍या सोमवारनिमित्त शिवमंदिरांमध्ये भाविकांची लगबग सुरू असते. त्र्यंबकेश्‍वरला भाविकांची मोठी गर्दी होत असते. विशेषतः तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त फेरीसाठी भाविक दाखल होतात.

भाविकांच्‍या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातर्फे रविवार (ता. १४)पासून २३० जादा बसगाड्या उपलब्‍ध केल्‍या जातील. जुन्या सीबीएससह अन्‍य विविध ठिकाणांहून या गाड्या सुटतील. (230 buses by MSRTC for third Shravan Monday nashik Latest Marathi news)

रविवार (ता. १४) आणि सोमवार (ता. १५) असे दोन दिवस जादा बसगाड्या उपलब्‍ध असणार आहेत. या दिवशी फेरीला मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होत असतात. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी रविवारपासूनच भाविक त्र्यंबकेश्‍वर परिसरात दाखल होत असतात. या भाविकांची सुविधा लक्षात घेता दोन दिवस जादा बसगाड्यांतून भाविक प्रवाशांची वाहतूक केली जाणार आहे.

महामार्गावरून सुटणार या ठिकाणांसाठी बस

जुन्या सीबीएसवरून त्र्यंबकेश्‍वरसाठी बसगाड्या सुटणार असल्‍याने, या बसस्‍थानकावरील अन्‍य मार्गांसाठीच्‍या बसगाड्या महामार्ग बसस्‍थानकावरून सुटणार आहेत.

त्‍यानुसार सटाणा, साक्री, नंदुरबार, नवापूर, कळवण, सुरगाणा, सतशृंगगड, पेठ, ननाशी, राक्षसभुवन, केलावण, ओझरखेड, बाफनाविहीर, ठाणापाडा, हरसूल, बालापाडा, पिपळगाव, शिवणगाव, गणेशगाव, धुमोडी, बेजे, इगतपुरी, कुशेगाव, घोटीकरिता बसगाड्या महामार्ग बसस्‍थानकावरून सुटतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Development : पुण्याच्या प्रश्नांचा विधानसभेत आवाज, आमदारांकडून उपाययोजनांची मागणी; वाहतूक कोंडीसह अतिक्रमणे हटवावीत

Ashadhi Wari 2025: 'जो तरुण भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात'; आधुनिक वाद्यांसह भारुडकार कृष्णा महाराज यांची भारुडसेवा

Gadchiroli Education: गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी पोलिसांना शरण; बोगस शिक्षक पराग पुडकेचा प्रस्ताव केला होता मंजूर

ख्रिश्चन आक्रमक! आमदार पडळकरांचे ख्रिश्चन धर्माबद्दल अवमानकारक वक्तव्य; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

Pune News : आपत्तींमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ; लष्करी अभियंत्यांच्या कामगिरीचेही कौतुक

SCROLL FOR NEXT