Manikrao Kokate
Manikrao Kokate esakal
नाशिक

Nashik News : आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून सिन्नरच्या बारा रस्त्यांसाठी 24 कोटी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर विधानसभा मतदारसंघासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात २४ कोटी ३२ लाख रुपयांच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून १२ रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

सिन्नर तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी निधीची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केली होती. त्यानुसार राज्याच्या अर्थसंकल्पात या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली.

त्यामध्ये ओझर-शिर्डी राज्यमार्ग ३५ च्या कामासाठी ५ कोटी ५० लाख, राष्ट्रीय महामार्ग ५० ते चास कारवाडी ते राज्यमार्ग ३२ ला जोडणारा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १ कोटी रुपये, सोमठाणे, पंचाळे, दोडी, ठाणगाव प्रमुख जिल्हा मार्ग यासाठी ५ कोटी रुपये, टाकेद गटातील इंदोरे ते खडकेद रस्ता १ कोटी रुपये, पांगरी.

शहा, उजणी, रामपूर, वडांगळी, गुळवंच, मुसळगाव या रस्त्यासाठी ४ कोटी रुपये, गोंदे, दापूरव चापडगाव या रस्ते कामासाठी ३ कोटी रुपये, भंडारदारवाडी, निनावी, सांकुर फाटा २ कोटी रुपये, धामणगाव ते अडसरे बु व अडसरे शिव टाकेद रस्ता १ कोटी २० लाख, शेनित ते जाधव वस्ती रस्ता ६० लाख,

धामणी ते प्रमुख राज्य मार्ग १२ ते बोराची वाडी यासाठी ३० लाख, धामणी जोड ते प्रमुख राज्यमार्ग १२ साठी ९० लाख निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT