income tax  esakal
नाशिक

Nashik News : शहरात 25 हजार नवीन मिळकती कर कक्षेत

चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांमध्ये विविध कर विभागाने २४ हजार ९९३ या नवीन मिळकतींवर कर लागू केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांमध्ये विविध कर विभागाने २४ हजार ९९३ या नवीन मिळकतींवर कर लागू केला आहे.

त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत या वर्षी ४४ कोटी २५ लाख रुपयांची भर पडणार असून, सरासरी साडेसोळा कोटी रुपये दरवर्षी घरपट्टी वसुलीत वाढ होणार आहे.(25 thousand new income tax in city nashik news)

पंधराव्या वित्त आयोगाने महापालिकांना उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्यथा वित्त आयोगाचा निधी मिळणार नाही, अशी स्पष्ट सूचना दिली आहे. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेकडून विविध उपाययोजना योजल्या जात आहे. त्यात विविध कर विभागाकडे मोठी जबाबदारी आहे.

त्याअनुषंगाने विविध कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार यांनी माहिती तंत्रज्ञानाचा अचूकपणे वापर करत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देणाऱ्या नगर रचना विभागालाच कर विभागाशी लिंक करून घेतले आहे.

महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर विविध कर विभागाकडून घरपट्टी तातडीने आकारली जाते. संगणकामध्ये त्याप्रमाणे सोय उपलब्ध करून दिली आहे. परिणामी एप्रिल ते डिसेंबर २०२३ या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये २४ हजार ९९३ मिळकती कर कक्षेमध्ये आल्या आहेत.

सव्वा पाच लाख मिळकती

विविध कर विभागाच्या या मोहिमेमुळे नाशिक महापालिकेच्या मिळकतींची संख्या झपाट्याने वाढली आहे. सद्यःस्थितीत पाच लाख १३ हजार मिळकतींची नोंद महापालिकेच्या दप्तरी झाली आहे.

यापूर्वी मार्च २०२३ पर्यंत चार लाख ८८ हजार मिळकती होत्या. दरम्यान काही ठिकाणी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसला तरी वापर आढळून आला. त्यामुळे दंडात्मक आकारणी करण्यात आली. त्यातून ९ कोटी १६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

SCROLL FOR NEXT