Onion Farmer Sakal
नाशिक

Video : गाडी भाडे 3800 रूपये; 25 क्विंटल कांद्याचे मिळाले 152 रूपये, शेतकऱ्याचा टाहो

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव नसल्यामुळे मोठा तोटा सहन करावा लागत असून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्यामुळे अश्रू येत आहेत. भाव मिळत नसल्यामुळे कांद्यावर ट्रॅक्टर, जेसीबी फिरवल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर एक आणि दोन रूपयांच्या पावत्या देऊन बाजार समित्यांनीसुद्धा शेतकऱ्यांची जणू खिल्ली उडवल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला २५ क्विंटल कांद्याचे फक्त १५२ रूपये मिळाले असून सदर शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कांद्याला प्रतीकिलो फक्त १६ पैसे एवढा दर मिळाला आहे. या शेतकऱ्याला स्वत:च्या खिशातून गाडी भाड्यासाठी पैसे द्यावे लागले आहेत. या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू असल्याचं सदर व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्यामुळे मोठा फटका बसत आहे. तर अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्यामुळे स्वप्नावर पाणी फिरलं आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू स्पष्टपणे दिसत आहेत. अहमदनगर, सोलापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा पिकाचा मोठा फटका बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT