death esakal
नाशिक

झाडावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : सुळेवाडी येथील तरुण जांभूळ तोडण्यासाठी झाडावर चढलेला असताना तोल जाऊन खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी (ता.१४) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

अमित सोमनाथ जाधव (२६) असे मृत तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजताच संपूर्ण सुळेवाडी गावावर शोककळा पसरली. पोलिसांनी सांगितले की सुळेवाडी येथे अमीत जाधव हा तरुण जांभूळ तोडण्यासाठी झाडावर चढला. जांभूळ तोडत असताना त्याचा तोल जावून तो खाली पडला व गंभीर जखमी झाला.

कुटूंबियांनी त्याला तात्काळ उपचारार्थ सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, तथापि उपचारांपूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती पोलिसांना मिळल्यानंतर पंचनामा करण्यात आला. ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार बागूल तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Minor Girl Assault Case : पुणे, नाशिकनंतर आता सांगली जिल्हा हादरला!, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, मुलीस लॉजवर नेलं अन्...

बॅटिंग vs बॅटिंग कमिन्सची चाणक्यनीती की श्रेयसचा पलटवार? 'नंबर १' च्या खुर्चीसाठी आज महासंग्राम, पहा कशी असेल Playing 11

Nashik Bribe Case : नाशिकमध्ये 50 हजारांची लाच घेताना महिला मंडल अधिकारी ACB च्या जाळ्यात; न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मागितली लाच

Thalapathy Vijay: “आईसारखं प्रेम दिलं…”; विजयचा प्रत्येकाने एकदा वाचावा असा भावनिक संदेश! निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच बोलले?

Arvind Kejriwal: 'मोदी सरकारचा अंत पंजाबमधून होईल’; अरविंद केजरीवाल यांची दावा, भाजपवर जोरदार निशाणा!

SCROLL FOR NEXT