teacher transfer  esakal
नाशिक

ZP Teacher Transfer: जिल्ह्यातील 270 शिक्षकांना बदल्यांपासून तूर्त अभय

अवघड क्षेत्रातील शिक्षकाच्या बदल्यांना स्थगिती

सकाळ वृत्तसेवा

ZP Teacher Transfer : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या जागा रिक्त न ठेवण्याचे आदेश असल्यामुळे बदली प्रक्रियेतील टप्पा सहा अंतर्गत जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्रातील २७० शिक्षकांची झालेली बदली प्रक्रियेला न्यायालयाने ७ जून पर्यंत स्थगिती दिली आहे.

त्यामुळे या २७० शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापासून तूर्त अभय मिळाले आहे. या शिक्षकांना पुढील आदेश येईपर्यंत कार्यमुक्त करता येणार नसले तरी, इतर बदली झालेल्या शिक्षकांना दिलेल्या शासन आदेशाप्रमाणे १५ मेपासून कार्यमुक्त करण्याची प्रक्रीया सुरू होणार आहे. (270 teachers in district currently protected from transfers nashik news)

ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांवरील शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हातंर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडली. २८ जानेवारीला बदल्यांचा पाचवा शेवटचा टप्पा संपला.

यात नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळांमधील एक हजार ९२८ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या आहेत. त्यांची यादी प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. त्यात संवर्ग एक मधील ३४८ शिक्षक, संवर्ग दोनमधील २०१, संवर्ग ३ मधील २२३, संवर्ग चार बदलीपात्र मधील ७९७,

संवर्ग पाच विस्थापित मधील ६ तर, संवर्ग सहा अवघड क्षेत्रातील ३२७ शिक्षकांचा यात समावेश आहे. बदली प्रक्रियेत पात्र नसतानाही सर्वसाधारण क्षेत्रातून ३२७ शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदली करण्यात आली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या बदल्यांना शिक्षकांनी विरोध दर्शवीत, बदल्या नको असे साकडे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना घातले होते. तसेच, संबंधित खात्यांतील सचिवांकडे देखील तक्रार केली होती. बदली झालेल्या ३२७ शिक्षकांपैकी २७० शिक्षकांनी या विरोधात न्यायालयात दाद मागितली.

यावर गत काही दिवसांपासून न्यायालयात सुनावणी प्रक्रीया सुरू आहे. यात, जिल्हातंर्गत बदल्यांमधील ज्या शिक्षकांच्या बदल्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्या शिक्षकांना सध्या तरी, कार्यमुक्त करू नये असे आदेश ग्रामविकास विभागाने बजावले आहे.

त्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेमधील अवघड क्षेत्रातील २७० शिक्षकांना कार्यमुक्त करता येणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या शिक्षकांना कार्यमुक्त करावयाचे नसले तरी, इतर शिक्षकांना आदेशानुसार १५ मे पासून कार्यमुक्त करण्यास सुरवात केली जाणार आहे. या शिक्षकांना ३१ मे पर्यंत बदली झालेल्या ठिकाणी हजर व्हावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Support AIADMK : तामिळनाडूत महाराष्ट्रासारखी फूट! आण्णा द्रमुकचे दोन भाग; थलपती विजयला थेट पाठिंबा

Pune Grand Tour: ‘पुणे ग्रँड टूर’चे रस्तेही खराब; १६५ कोटींचे काम खोदाईमुळे वाया, नियमांचे उल्लंघन, काम पूर्ण होऊनही दुरुस्ती नाही!

'नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न केले, पण…' ‘कमळी’ फेम अभिनेत्रीने सांगितला बाळंतपणाचा अनुभव, म्हणाली... 'त्या क्षणी खूप रडले…'

PM मोदींनी केलेल्या अचानक घोषणे बद्दल काय आहे शरद पवारांचे मत? केली मोठी भविष्यवाणी

Raj Thackeray criticism narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले 'भुर्दंड जनतेला का ?'

SCROLL FOR NEXT