Officers and staff of Solid Waste Management Department while taking action by confiscating plastic bags and giving fine receipts  esakal
नाशिक

Nashik Plastic Ban: तिघा व्यावसायिकांवर करवाई; 29 किलो प्लॅस्टिक पिशवी जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Plastic Ban: प्लॅस्टिक पिशवी वापर व विक्रीवर बंदी असताना वापर व विक्री करताना आढळून आलेल्या तिघा व्यावसायिकांवर शुक्रवारी (ता. ८) पंचवटी मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे.

या कारवाईमध्ये जवळपास २९ किलो प्लास्टिक पिशवी जप्त करीत पंधरा हजार रुपये दंड करण्यात आला. (29 kg plastic bag seized from 3 Professional nashik news)

दिंडोरी नाका, बाजार समिती, शरदचंद्र पवार मार्केट, आरटीओ परिसर, हिरावाडी, डाळिंब मार्केट निलगिरी बाग, नांदूर नाका, कोणार्कनगर, जत्रा हॉटेल परिसर, म्हसरुळ, मखमलाबाद, रामतीर्थ आदी परिसरात घनकचरा व्यवस्थापन विभाग पथकाने केलेल्या पाहणीत प्रतिबंधित प्लॅस्टिक हॅण्डल बॅग, प्लॅस्टिक ग्लास वापर व विक्री करताना आढळून आल्याने ३ व्यावसायिकांना पहिला गुन्हा म्हणून ५ हजार रुपये याप्रमाणे १५ हजार रुपये दंड करून २९ किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक पिशव्या व प्लॅस्टिक ग्लास जप्त केले.

व्यावसायिक व ग्राहकांनी प्रतिबंधित प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करावा. दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदीसाठी घातक पिशव्यांचा वापर करू नये याबाबत जनजागृती करण्यात आली.

विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत दुर्गादास माळेकर, किरण मारू, दीपक चव्हाण, विकी टाक, वाहनचालक संजय जाधव सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT