Corona  sakal
नाशिक

नाशिक : कोरोनाबाधितांमध्ये दोन हजार ९०० ची वाढ

मृत्‍यूचे प्रमाण चिंताजनक, तेवीस मृत्‍यूंची नोंद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सरत्‍या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाचे नाशिककरांनी जल्‍लोषात स्‍वागत केले. मात्र, जानेवारी महिना कोरोनाबाधितांची रुग्‍णसंख्या वाढीच्‍या दृष्टीने सुरवातीपासून आव्‍हानात्‍मक राहिला होता. अशात महिना संपत असताना, शहरी भागात काही प्रमाणात दिलासादायक स्‍थिती आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या अधिक राहात आहे. त्यामुळे ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येतील वाढ मंदावली आहे. गेल्‍या १५ दिवसांत नाशिक महापालिका क्षेत्रातील ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांत केवळ दोन हजार ९०० ची भर पडली आहे. मात्र, मृत्‍यूचे प्रमाण चिंताजनक आहे. १५ दिवसांत २३ मृत्‍यूंची नोंद झाली आहे.

कोरोना महामारीच्‍या तिसऱ्या लाटेत रुग्‍णसंख्या वाढही शहरी भागावर केंद्रित असल्‍याचे आढळले होते. त्‍यामुळे नाशिक महापालिका क्षेत्रातील स्‍थिती अवघ्या काही दिवसांत विपरीत झाली होती. मात्र, गेल्‍या आठवड्यात पुन्‍हा परिस्‍थिती नियंत्रणात येत असल्‍याचे सध्या तरी आकडेवारीतून स्‍पष्ट होत आहे. १५ जानेवारीपासून ते रविवार (ता. ३०) या १५ दिवसांच्‍या कालावधीत नाशिक महापालिका क्षेत्रात २३ हजार ५८७ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. दुसरीकडे या कालावधीत २० हजार ६६४ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली आहे. दिवसांत २३ बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद आहे. अशात १५ जानेवारीला नाशिक महापालिका क्षेत्रातील ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांची संख्या सात हजार ५३५ होती. त्‍यात १५ दिवसांत दोन हजार ९०० ची भर पडली असून, सद्यःस्‍थितीत नाशिक महापालिका क्षेत्रात दहा हजार ४३५ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

तपासण्या घटल्‍या?

दरम्‍यान, तिसऱ्या लाटेसह काही दिवसांपूर्वी शहरात सर्दी-खोकल्‍यासह तापाची साथ सुरू असल्‍याचे बघायला मिळत होते. या साथीच्‍या आजाराची लक्षणे कोरोनासदृष्य होती. अशात अनेक रुग्‍णांनी स्‍वॅब चाचणी न करता थेट उपचार घेतल्‍याचे बोलले जात आहे. त्‍यामुळेच रुग्‍णसंख्येत घट झाली असल्‍याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Open: लक्ष्य सेन, पी. व्ही. सिंधूच्या कामगिरीवर लक्ष; थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून; आयुष शेट्टीकडूनही अपेक्षा

Latest Marathi News Live Update : लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे ३ हजार याच आठवड्यात मिळण्याची शक्यता

IPL च्या कारणाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय; पाकिस्तान, बांगलादेश दौऱ्यासाठी कमिन्ससह 'या' प्रमुख खेळाडूंची निवड नाही

NCPच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत पार्थ आणि जय पवार; तर प्रफुल्ल पटेलांना वगळलं, सुनेत्रा पवारांनी दिलं स्पष्टीकरण

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये स्थळ पाहणीला सुरुवात, आमदार शिवाजी पाटलांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT