Crime esakal
नाशिक

Nashik Crime: कपालेश्वर मंदिरासमोरून 3 दुचाक्याला चोरीला

कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गोदाघाटावरील श्री कपालेश्वर मंदिरासमोर असलेल्या पार्किंगमधून चोरट्यांनी तिघांच्या तीन मोटारसायकली लंपास केल्या आहेत.

यातील दोन घटना या गेल्या १ तारखेच्या आहेत. यामुळे कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे. (3 bikes stolen from front of Kapaleshwar temple Nashik Crime)

नाशिक : समाधान भालेराव देसले (रा. विश्वासनगर, अशोकनगर, सातपूर) यांची ३० हजारांची दुचाकी (एमएच १५ जीझेड ९३६३) गेल्या सोमवारी (ता.१) कपालेश्वर मंदिरासमोर पार्क केली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

तर, जयप्रकाश रघुनाथ देशमुख (रा. खांदवेनगर, गंगापूर रोड) यांची २० हजाराची दुचाकी (एमएच १५ एझेड ७७९०) गेल्या २५ डिसेंबर रोजी कपालेश्वर मंदिरासमोरून चोरीला गेली. मिलिंद बाऊस्कर (रा. कपील वास्तूनगर, पाथर्डीफाटा) यांची २० हजारांची दुचाकी (एमएच १९ सीबी ७९१०) गेल्या सोमवारी (ता.१) कपालेश्वर मंदिरासमोरच पार्किंगमधू अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गजानन नाना सकेंगे (रा. गायत्रीनगर) यांची ४० हजारांची ॲक्टिवा मोपेड (एमएच १५ एचबी ५५९१) गेल्या ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री सोसायटीच्या पार्किंगमधून चोरीला गेली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT