Heavy Rain Damage esakal
नाशिक

Nashik : तुम्हीच सांगा जगायचे कसे?; 3 दिवसांच्या पावसानंतर रस्त्यावरील व्यावसायिकांचा प्रश्‍न

दत्ता जाधव

नाशिक : अवघ्या चार दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अनेकांनी कर्ज, उसने पैसे घेत रस्त्यावर व्यवसाय उभा केला. परंतु गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे विक्रीसाठी आणलेला मालाचा बचाव करावा लागत असल्याने तुम्हीच सांगा, आम्ही जगावे कसे, असा प्रश्‍न या व्यावसायिकांना पडला आहे. (3 days continuous Heavy rain street professionals in trouble Nashik Latest Marathi News)

कोरोनानंतर यंदा दोन वर्षांच्या खंडानंतर निर्बंधमुक्त वातावरणात दीपावली साजरी होत आहे. त्यामुळे मंदीचे वातावरण असूनही खरेदीदार व विक्रेत्यांमध्ये मोठा उत्साह आहे. परंतु, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना व्यवसाय करणे अवघड होऊन बसले आहे. यातील अनेकांनी कर्ज, उसनवार पैसे घेऊन तात्पुरता व्यवसाय उभा केला आहे. परंतु रोजच येणाऱ्या जोरदार पावसाने मोठ्या जिद्दीने उभा केलेला व्यवसाय अक्षरश झाकून ठेवावा लागत असल्याचे दिसून आले.

मालाचे संरक्षण करणे जिकिरीचे

कोरोनाकाळात सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतील अनेक लहान- मोठ्या कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे अनेक तरुणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. मात्र त्यातील अनेकांनी जिद्द न सोडता सिझनेबल व्यवसाय सुरू केले. यात आकाशकंदील, रुमाल विक्री असे व्यवसाय अनेकांनी पसंत केले, तर काहींनी फटाके विक्रीला पसंती दिली.

याशिवाय अनेक छोटे व्यवसाय सुरू केले, त्यासाठी जिद्दीने भांडवलही उभे केले. परंतु पावसाच्या संततधारेने व्यवसाय होणे दूरच, परंतु पावसापासून विक्रीसाठी आणलेल्या मालाचे संरक्षण करणे जिकिरीचे झाले आहे. बुधवारी (ता.१९) सायंकाळी पावसाने थोडी उघडीप देताच या विक्रेत्यांशी संवाद साधला असता, त्यांनी रोजच्या पावसामुळे व्यवसाय करणे अवघड झाल्याचे सांगितले.

"नातेवाईक व मित्रांच्या मदतीने दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तुंची विक्री सुरू केली, परंतु गेल्या तीन दिवसांपासून रोजच कोसळणाऱ्या पावसामुळे ग्राहक दुरापास्त झाला आहे. पावसाच्या भीतीने माल झाकूनच ठेवावा लागत आहे." - संजय तिवारी, व्यावसायिक

"यंदा निर्बंध शिथिल झाल्याने मोठ्या प्रमाणावर आकाशकंदील बनवून विक्रीसाठी ठेवले आहेत, परंतु दिवाळीला अद्याप दोन- तीन दिवस बाकी असल्याने अद्याप आकाशकंदीलाला मागणी नाही." - राजू परदेशी, आकाशकंदील विक्रेता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Air Pollution : फटाक्यांमुळे आजार बरे होत असल्याचे भाजपच्या आमदाराचे अजब विधान; टीकेनंतर मागितली माफी

ZIM vs AFG Test : ७५ वर्षांत न घडलेलं घडलं! झिम्बाब्वेच्या Craig Ervine ने रचला इतिहास; इतक्या वर्षात एकाही भारतीयाला हे नाही जमलं

Mumbai AQI: फटाक्यांमुळे प्रदूषणाचा झाकोळ! महामुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली; धक्कादायक अहवाल समोर

Latest Marathi News Live Update: शासन नियुक्त संचालक पोलीस बंदोबस्तात गोकुळ दूधसंघात दाखल

Car Fire Incident :दगडफेक, कार पेटवून दहशत: आठ जणांना अटक ;गोंधवणी रस्त्यावर मध्यरात्री दोन गटांत राडा

SCROLL FOR NEXT