Officers of the Institute of Indian Interior Designers on the occasion of the event. esakal
नाशिक

Knowledge Fest Design : IIIDतर्फे 3 दिवसीय नॉलेज फेस्ट डिझाईनचे आयोजन

विक्रांत मते

नाशिक : इंटिरियर डिझायनर्सची राष्ट्रीय संस्था इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझाइनर (आयआयआयडी) नाशिक चॅप्टरतर्फे १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय नॉलेज फेस्ट डिझाईनचे आयोजन करण्यात आले आहे. (3 days Knowledge Fest Design by IIID Nashik News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली प्रधान, प्रदर्शनाच्या समन्वयक तरन्नुम कादरी, कोषाध्यक्ष हकीम सिन्नरवाला, प्रसाद गणोरे, स्मिता वाणी, अनिल राका, अतुल बोहरा, संजय पाटील, नितीन कुटे, धनंजय शिंदे, सागर काब्रे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देताना समन्वयक तरन्नूम कादरी म्हणाल्या, ‘सेलिब्रेटिंग लाइफ थ्रू डिझाईन’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम केवळ प्रदर्शन न ठरता हा शहराचा डिझाईन जल्लोष ठरणार आहे. यामध्ये विविध नामवंत आणि नावीन्यपूर्ण उत्पादनांसोबत विविध वर्कशॉप विद्यार्थ्यांसाठी स्टुडन्ट कॉर्नर डिझायनर ॲरेना कार्निव्हल स्ट्रीट अशी विविध आकर्षणे येथे राहतील.

आपले अनुभव आणि कौशल्य वापरून इंटिरियर डिझायनर वास्तूला राहण्यास योग्य करत असतात. त्यामुळे शहराच्या एकूणच लाईफस्टाईल मध्ये इंटिरियर डिझायनरचे काम महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रदर्शन कालावधीमध्ये देशातील डिझाईन क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती नाशिकला येणार असून, त्यांचे मार्गदर्शनदेखील नाशिककरांना घेता येईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पटेल व सुरुची रणदिवे यांनी केले. आभार सचिव रूपाली जायखेडकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT