A Mercedes that was crushed in an accident on the highway in Shiwara here. In the second photo, an accident-prone Tempo. esakal
नाशिक

Nashik Accident News: भरधाव मर्सिडिज ट्र्कवर धडकून 3 ठार; बोरटेंभे शिवारातील अपघात

एकजण गंभीर जखमी असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर : नाशिक-मुंबई महामार्गावर इगतपुरीजवळील बोरटेंभे शिवारात सोमवारी (ता. १) पहाटे चारच्या सुमारास भरधाव मर्सिडिज कार (एमएच ०२, ईएक्स ६७७७) भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयशरवर (एमएच १८, बीझेड ७२४७) पाठीमागून जोरदार धडकून झालेल्या अपघातात दादर (मुंबई) येथील तीन तरुण जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. (3 killed in collision with speeding Mercedes truck Accident in Bortembhe Shiwar Nashik News)

अपघातामुळे काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच इगतपुरी पोलिस व महामार्ग पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले व जखमींना रूट पेट्रोलिंग टीम, टोलप्लाझा रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात नेले.

या घटनेतील तिघांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. एक जण गंभीर जखमी असल्याने त्यास नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

या घटनेत कारमधील मृत्यू झालेल्यांची नावे ध्यज युगराज जैन (२४, रा. दादर, मुंबई), शिखर शिशू यादव (२३, रा. १८०२ आशीर्वाद, कोकिळाबेन हॉस्पिटल, लेन ४, बंगलोज, लालबाग, मुंबई) व ऋषभ ललीत सोळंकी (२३ , रा. लालबाग, परेल, मुंबई) अशी आहेत.

तिघांच्या कुटुंबीयांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कांचन भोजणे, पोलिस उपनिरीक्षक सोपान राखोंडे व पोलिस पथक तपास करीत आहे.

ना फलक, ना चांगला रस्ता

इगतपुरी शहराकडे जाण्यासाठी बोरटेंभे, तळेगाव व महिंद्र कंपनी या भागातील महामार्गापासून जवळच मार्ग जोडला गेला आहे. मात्र महामार्गावर दिशाफलक लावले नसून गतिरोधकही अर्धवट स्थितीत आहेत.

तेथे मोठे खड्डे तयार झाले आहेत. अनेक भागात मोकाट जनावरे महामार्गावर अचानक येतात. त्यामुळे बोरटेंभे व तळेगाव महामार्गावरील अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत.

घोटी टोलप्लाझा केवळ वसुलीवरच लक्ष केंद्रित करीत असल्याची वाहनचालकांची तक्रार आहे. महामार्गावरील सुरक्षा व रस्ते दुरुस्तीकडे मात्र साफ दुर्लक्ष केल्याने या भागात अपघाताचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याची खंत वाहनधारकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: पाचोर्‍यातील कृष्णापुरीतील उपद्रवी माकडाला पकडण्यात यश

SCROLL FOR NEXT