Student School Nutrition  esakal
नाशिक

Nashik News: पोषण आहारापासून 3 लाख बालके वंचित; अंगणवाडी सेविका, मदतनीस संपाचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीतर्फे अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी चार डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपाला दहा दिवस उलटून देखील, यावर अजूनही कोणताही तोडगा निघालेला नाही.

या संपाचा फटका अंगणवाडीमधील लाखो बालकांना बसत आहे. अंगणवाडी बंद असल्याने सहा वर्षांपर्यंतची सुमारे तीन लाख बालके पोषण आहारापासून वंचित आहेत. पोषण आहार मिळत नसल्याने कुपोषण वाढण्याची शक्यता आहे.

ग्रॅच्युईटीबाबत कोर्टाच्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी, अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना किमान 18 हजार ते 26 हजारापर्यंत मानधन वाढ करावी, आहाराचा दर सर्वसाधारण बालकाला 16 रुपये व अतिकुपोषित बालकाला 24 रुपये असा करण्यात यावा. (3 lakh children deprived of nutrition nashik news)

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारे वेतनश्रेणी, भविष्य निर्वाह निधी, सामाजिक सुरक्षांचा लाभ देण्यात यावा. सेवासमाप्तीनंतर मृतसेविका, मदतनिसांना एक रकमी लाभ त्वरित देण्यात यावा आदी मागण्यांसाठी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने अंगणवाडी सेविका-मदतनीस यांनी बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला आहे.

संपकाळात जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद करून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस संपात सहभागी झाल्या आहेत. या संपाचा दुसरा आठवडा आहे. या संपाचा फटका लाखो बालकांना बसत आहे. अंगणवाडी बंद असल्याने सहा वर्षांपर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. सोबतच गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, कुपोषण निर्मूलन आदी कार्यक्रमांवरही मोठा परिणाम होत आहे.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संपामुळे गरोदर मातेचा आहार, स्तनदा मातेचा आहार, शून्य ते तीन वर्षे वयोगटातील मुलांचा आहार, तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांचा आहार बंद झालेला आहे. सोबतच कुपोषण कमी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका-मदतनीस यांच्यावर असते. याचा देखील फटका बसताना पाहायला मिळत आहे.

शंभर टक्के सेविका संपात

जिल्ह्यातील एकूण 9 हजार 714 अंगणवाडी सेविका, मिनीसेविका व मदतनीस यापैकी तब्बल 8 हजार 939 सेविका, मिनी सेविका व मदतनीस संपात सहभागी झालेले आहेत. केवळ 150 कर्मचारी अंगणवाड्यांमध्ये हजर आहेत अशी नोंद जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे आहे.

अंगणवाड्यांचा तपशील संपात सहभागी

जिल्ह्यातील एकूण अंगणवाडया 4 हजार 609 4 हजार 200

मिनी अंगणवाडी संख्या : 498 478

एकूण अंगणवाडी सेविका : 4 हजार 265 4 हजार 200

मिनी सेविका : 491 478

एकूण अंगणवाडी मदतनीस : 4 हजार 359 4 हजार 261

तीन ते सहा वयोगटातील एकूण मुले : 3 लाख 9 हजार 801

अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या: 1 हजार 969

मध्यम तीव्र कुपोषित :5 हजार 557

"बालकांना स्थानिक महिला बचतगट, विविध महिला मंडळ, ग्रामपंचायत तसेच लाभार्थी यांच्या माध्यमातून पोषण आहार देण्याबाबत सूचना केलेल्या आहे. काही अंगणवाड्यांमध्ये याची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी हे काम होत नसल्याच्या तक्रारी आहेत." - प्रताप पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT