crime news crime news
नाशिक

नाशिक : सिडको भागात टोळक्याकडून तिघांवर धारदार शस्त्राने वार

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : मागील भांडणाची कुरापत काढत दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने तिघांवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याचा प्रकार सोमवारी (ता.२६) रात्री बडदेनगर ते पाटीलनगर रस्त्या दरम्यान घडला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. इतरांचा शोध घेतला जात असल्याची माहिती अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुमार चौधरी यांनी दिली. (3 people were attacked with sharp weapons by a mob in CIDCO area)

सोमवारी रात्री देवचंद केदारे व संतोष मंडलिक हे घरी जात असताना दर्शन दोंदे, सनी बच्छाव, प्रशिक अंडागळे, अक्षय कारंजे, पवन वायाळ, रोशन जाधव, आशीर्वाद डगळे, देवराम पोल, गणेश खांडवे, जितेंद्र चौधरी ऊर्फ छोट्या काळ्या, मॉटी दळवी, शंतनू भोर, ललित कदम यांनी केदारे, मंडलिक व दीपक पारधी यांना अडवले. मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. लाकडी दंडुके, तसेच धारदार शस्त्राने मारहाण केली. मारहाणीत देवचंद केदारे यांच्या पोटावर, छातीवर, मांडीवर धारदार शस्त्राने वार केले. सनी बच्छाव यांनी संतोष मंडलिक यांच्या छातीवर, पाठीवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. या वेळी आरडाओरडा झाल्याने संशयितांनी अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला. जखमी देवचंद केदारे यांच्यासह त्यांचे मित्रावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक श्री. कोल्हे करीत आहे.

(3 people were attacked with sharp weapons by a mob in CIDCO area)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT