death
death  esakal
नाशिक

Nashik Accident News : शहरात वेगवेगळया अपघातात तिघे ठार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडावरून देवीचे दर्शन घेऊन घरी परतत असताना, पंचवटीतील क्रीडा संकुल येथे रस्त्यावरील खड्डयात दुचाकी आदळली आणि दुचाकीवरून खाली पडलेल्या महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागला. (3 people were killed in separate accidents in city nashik accident news)

त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची या ना त्या कारणाने खोदकाम करून रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. याच खड्ड्यांनी एका महिलेचा जीव घेतला आहे. तर, दुसऱ्या दोन घटनांमध्ये रेल्वेच्या धडकेत महिलेचा तर पंचवटीत दुचाकी घसरून युवकाचा मृत्यु झाला आहे.

कल्पना राजेंद्र ससाणे (२५, रा. राजुर बहुला, ता. नाशिक) असे मयत महिलेचे नाव आहे. राजेंद्र ससाणे व कल्पना ससाणे हे दाम्पत्य गेल्या २३ एप्रिल रोजी सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दुचाकीने ते घराकडे परतत असताना पंचवटीतील स्व. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल रस्त्याने ते जात असताना, रस्त्यावरील खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली.

त्यामुळे पाठीमागे बसलेल्या कल्पना या रस्त्यावर पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा गेल्या रविवारी (ता. ३०) मृत्यु झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दुचाकी घसरून चालकाचा मृत्यु

दिंडोरी रोडवरील वज्रेश्वरी झोपडपट्टी येथे दुचाकी घसरून गंभीररित्या जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. हेमंत भिवसन बच्छाव (२३, रा. वज्रेश्वर झोपडपट्टी, दिंडोरी रोड) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

हेमंत हा गेल्या १४ एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून पंचवटीकडून घरी येत असताना दुचाकी घसरून तो गंभीररित्या जखमी झाला. त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात व नंतर आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले असता, त्याचा गेल्या रविवारी (ता. ३०) उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

रेल्वेच्या धडकेत महिला ठार

देवळाली कॅम्प हद्दीतील वंजारवाडी येथे धावत्या रेल्वेची धडक बसून ४० वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. उषा सुरेश काळे (४०, रा. काळे वस्ती, वंजारवाडी) असे मयत महिलेचे नाव आहे. सदरील घटना गेल्या सोमवारी (ता. १) सकाळी घडली. उषा शौचालयासाठी रेल्वे रुळ ओलांडून जात असताना सदरचा प्रकार घडला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT