Jalgaon Accident News : दुचाकीवरून घसरून मुलाचा मृत्यू

death
death esakal

Jalgaon News : दुचाकी घसरून अपघात झाल्याने जखमी १५ वर्षीय मुलाचा रुग्णालयात उपचार घेत असताना सोमवार(ता.१) रोजी मृत्यू झाला. (15 year boy dies after falling from bike jalgaon accident news)

सुमित ज्ञानेश्वर सपकाळे (वय-१५ रा. किनोद ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तालूका पोलिसात अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सुमित सपकाळे हा शनिवार (ता.२९) रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होता. जळगाव किनोद रस्त्यावर दुचाकी घसरून पडल्याने त्याचा अपघात झाला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

death
Crime News : फोन घेत नाही म्हणुन महिलेस शिवीगाळ, जिवे ठार मारण्याची धमकी

अपघातानंतर घटनेची माहिती मिळाल्यावर कुटूंबीय ग्रामस्थांनी सुमितला जळगाव शहरातील खासगी क्रिटिकल केअर ॲण्ड ट्रॉमा सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले होते.

उपचार सुरू असताना सोमवार (ता.१ मे) रोजी दुपारी सुमित याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

death
Jalgaon Crime News : पान खाणे पडले महागात! पाठ वळताच दुचाकी लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com