Corona Updates News Nashik
Corona Updates News Nashik esakal
नाशिक

नाशिक : जिल्ह्यात दिवसभरात 30 रुग्‍ण कोरोनाबाधित

अरुण मलानी

नाशिक : शंभराहून अधिक दिवसांनंतर दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या पन्नासहून अधिक राहिल्‍यानंतर, सोमवार (ता. २७)चा दिवस जिल्‍हावासीयांसाठी दिलासादायक राहिला. दिवसभरात जिल्ह्या‍त ३० रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. साठ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्णसंख्येत ३० ने घट झाली. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात १९९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. (30 patients corona positive in nashik district nashik news update)

गेले काही दिवस दैनंदिन बाधितांच्‍या तुलनेत कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या अधिक राहत असल्‍याने सक्रिय रुग्णसंख्येत सातत्‍याने वाढ सुरू होती; परंतु आता कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्यादेखील वाढत असल्‍याने ॲक्‍टिव्‍ह रुग्णसंख्या नियंत्रणात आहे.

सोमवारी नाशिक शहरातील २३, नाशिक ग्रामीणमधील पाच, तर जिल्‍ह्याबाहेरील दोन रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. मालेगाव महापालिका क्षेत्रात नव्‍याने बाधित आढळून आला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत ३१७ अहवाल प्रलंबित होते.

यांपैकी सर्वाधिक २०२ अहवाल नाशिक ग्रामीण, तर नाशिक शहरातील ८२, मालेगावच्‍या ३३ रुग्‍णांचे अहवाल होते. गेल्‍या काही दिवसांपासून वाढलेला पॉझिटिव्हिटी दरही घसरला आहे. सोमवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्‍हिटी दर १.९८ टक्‍के राहिला, तर नाशिक महापालिका क्षेत्राचा हा दर २.९६ टक्‍के राहिला. सध्या उपचार घेत असलेल्‍या बाधितांपैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील १३०, नाशिक ग्रामीणमधील ५३, मालेगाव महापालिका क्षेत्रातील सहा, जिल्‍ह्याबाहेरील दहा बाधितांवर उपचार सुरू आहेत.

पालकमंत्री भुजबळांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. या संदर्भात ट्विट करत त्‍यांनी माहिती दिली. प्रकृती उत्तम असून, डॉक्‍टरांच्‍या सल्ल्‍यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असल्‍याचे सांगताना संपर्कात असलेल्‍या व्‍यक्‍तींनी काळजी घ्यावी. लक्षणे दिसल्‍यास तत्‍काळ तपासणी करून घेण्याचे आवाहन त्‍यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही नुकतीच कोरोनाची लागण झालेली आहे. त्‍यापाठोपाठ आता पालकमंत्री भुजबळ यांचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT