Rain Crisis
Rain Crisis esakal
नाशिक

Rain Crisis: जिल्ह्यात यंदा 30 टक्के पाणीसाठा कमी; केवळ 5 धरणांनी ओलांडली शंभरी, तर 3 धरणे अजूनही निरंकच

संदीप मोगल

Rain Crisis : मागील वर्षी ऑगस्टअखेर जिल्ह्यातील बहुतांशी धरणे काठोकाठ भरली होती. यंदा केवळ बोटावर मोजण्याइतकीच धरणे भरली आहेत.

तिसगाव, नागसाक्या, माणिकपुंज ही मागील वर्षी १०० टक्के भरलेली तीन धरणे निरंक आहेत. जिल्ह्यात १९ धरणे मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

भावली, वालदेवी, नांदूरमध्यमेश्वर, हरणबारी व केळझर धरणे शंभर टक्के भरली आहेत. (30 percent less water storage in district this year Only 5 dams have crossed hundred mark while 3 dams still unmarked nashik)

गेल्या वर्षी जोरदार झालेल्या पावसाने यंदा नाशिककरांची घोर निराशा केली आहे. मागील वर्षी जूनपासूनच पावसाचा जोर अधिक राहिल्याने धरणेही झटपट भरली.

त्यामुळे ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणांमध्ये ६३ हजार ९५५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता.

म्हणजेच धरणे ९७ टक्के भरली होती. यंदा केवळ ६७ टक्के म्हणजेच केवळ ४३ हजार ८१६ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या धरणांमध्ये तब्बल ३० टक्के पाणीसाठा कमी आहे.

या धरणांत १०० टक्के पाणी

भावली, वालदेवी, नांदूरमध्यमेश्वर, हरणबारी व केळझर.

या धरणांत ०० टक्के पाणी

तिसगाव, नागसाक्या, माणिकपुंज.

मागील वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच २४ पैकी १८ धरणे शंभरीच्या आसपास होती. यंदा केवळ पाच धरणांनी शंभरी ओलंडली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठा

धरण २०२२ २०२३

गंगापूर ९५ ९१

काश्यपी ९८ ६३

गौतमी गोदावरी ९८ ५८

आळंदी १०० ८८

पालखेड ९० ५५

करंजवण ९५ ६८

वाघाड १०० ८०

ओझरखेड १०० ४७

पुणेगाव ९६ ९२

तिसगाव १०० ००

दारणा १०० ८७

भावली १०० १००

मुकणे ९८ ७८

वालदेवी १०० १००

कडवा ९५ ८५

नांदूर मध्यमेश्वर ७० १००

भोजापूर १०० ७१

चणकापूर ९३ ९३

हरणबारी १०० १००

केळझर १०० १००

नागासाक्या १०० ००

गिरणा ९८ ३७

पुनंद ९१ ७५

माणिकपुंज ८८ ००

एकूण ९७ ६७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT