Shelter Exibition esakal
नाशिक

Nashik News : शेल्टर प्रदर्शनाला 30 हजार नागरिकांची भेट

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्रातील सर्वात मोठे क्रेडाई प्रॉपर्टी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी तीस हजार नाशिककरांनी भेट दिली. डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू असलेल्या प्रदर्शनात एकच छताखाली उपलब्ध घरांचे पाचशेहून अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी साइट व्हिजिटचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवसांपर्यंत सुमारे तीस हजार नागरिकांनी प्रदर्शनास भेट दिली. सुमारे १७५ सदनिकांची नोंदणी करण्यात आली. स्पॉट बुकिंगमुळे बांधकाम उद्योगात उत्साहाचे वातावरण असल्याचे प्रतिपादन क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी केले.

(30 thousand Citizens Visited Shelter exhibition Nashik News)

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

शेल्टर प्रदर्शनातील या प्रतिसादाचे नाशिकच्या अर्थकारणात सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वास व्यक्त करून शेल्टर समन्वयक कृणाल पाटील यांनी व्यक्त केला. प्रदर्शनास भेट देण्यासाठी क्युआरकोड स्कॅन करून ऑनलाइन नोंदणी केल्यास कोणतेही शुल्क लागणार नसून, याचादेखील सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे करण्यात आले आहे.

शेल्टर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय क्रेडाई उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, राष्ट्रीय क्रेडाई समिती प्रमुख (घटना) जितूभाई ठक्कर, महाराष्ट्र क्रेडाई सचिव सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष किरण चव्हाण, सुरेश पाटील, नेमीचंद पोतदार, उमेश वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. क्रेडाई नाशिक मेट्रो मानद सचिव गौरव ठक्कर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, सहसचिव अनिल आहेर, सहसचिव सचिन बागड, कमिटी सदस्य नरेंद्र कुलकर्णी, नितीन पाटील, मनोज खिंवसरा, अंजन भालोदिया, अतुल शिंदे, सुशील बागड, राजेश आहेर, हर्षल देशमुख, श्रेणिक सुराणा, नरेंद्र कुलकर्णी, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके कार्यरत आहेत.

भाग्यवंत विजेते

प्रथम - घोलप, द्वितीय - अजिंक्य पवार, तृतीय - नीलेश महाजन, चतुर्थ - अनिल गुप्ता, पाचवे - आदित्य भालेराव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT