Balasaheb Lagad has captured the scene of the temple and its surroundings illuminated in the evening on a drone camera. esakal
नाशिक

Navratrotsav 2022 : सातवी माळ; सुटीमुळे 30 हजारांवर भाविक जगदंबाचरणी लीन

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : कोटमगाव येथील नवसाला पावणाऱ्या श्री महाकाली, श्री महालक्ष्मी व श्री महासरस्वती या तीन देवींचे एकरूप जगदंबा मातेच्या दर्शनासाठी रविवारी (ता.२) सातव्या माळेला रविवारच्या सुटीची पर्वणी साधून सुमारे ३० ते ४० हजार भाविकांनी गर्दी केली होती.

सकाळी आठपासून सुरू झालेला गर्दीचा महापूर रात्री अकरालाही सुरूच होता. दरम्यान, दोन वर्षांच्या ब्रेकनंतर यंदा यात्रेत रोजच मोठी गर्दी होत असून, खरेदी-विक्रीने व्यावसायिकांना मोठा आधार मिळाला आहे. (30 thousand devotees present on holiday in Jagdamba mata kotamgaon nashik Latest Marathi News)

विकलागांना आधार देणारी, दुर्बलांना सबल करणारी अन् निशस्त्रकाला शक्ती देणारी ही जगदंबामाता समजली जात असल्याने नेहमीच या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रेलचेल असते. नवरात्रोत्सवात येथे भव्य यात्रा भरली असून, नाशिकसह नगर, औरंगाबाद, धुळे आदी जिल्ह्यांतून लाखो भाविक दर्शनाला येऊन गेले आहेत. रोजच पंधरा-वीस हजारांच्या आसपास भाविक दर्शन घेतात. आज हाच आकडा सातव्या माळेसह रविवारच्या सुटीमुळे दुपटीवर पोचला होता.

दर्शनासाठी प्रत्येक माळेगणिक भाविकांची गर्दी वाढत आहे. भक्तांमुळे कोटमगाव फुलून गेले आहे. खरंतर पाचव्या, सातव्या व नव्या माळेला येथे भाविकांची गर्दी असते. पावसाने उघडीप दिल्याने ग्रामीण भागातील भाविकांनी आज देवीच्या दर्शनाची पर्वणी साधली. चार दिवसांपासून सायंकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतीची कामेही काहीअंशी थांबली असून, मुलांना शाळेला सुटी असल्याने ग्रामीण भागातून पिक-अप, ट्रॅक्टरमध्ये कुटुंब दर्शनासाठी येत होते.

यामुळे सकाळपासून सुरू झालेली गर्दी सायंकाळपर्यंत ओसरलेली नव्हती. गर्दीमुळे भाविकांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागले. शिवाय वाहनांची पार्किंग आणि यात्रेतील खरेदीवरही मुरड घालावी लागली. रोज पहाटे येवल्यातील दोन ते तीन हजार भाविक पायी दर्शनासाठी जात असून, सायंकाळी सातनंतर रात्री अकरापर्यंत रस्ता फुल होऊन वाहत आहे.

रात्री नऊला देवीची आरती केली जात असून, मंदिरासमोरील प्रांगणात घटी बसलेल्या भाविकांसाठी रोज धार्मिक कार्यक्रम होतात. घटी बसलेले भाविकही या कार्यक्रमाचा लाभ घेतात. विविध सामाजिक संस्थांतर्फे भाविकांना फराळवाटप केले जाते. अनेक भाविक नवसपूर्तीसाठीही येत आहेत.

● कोटमगाव उजळले

मंदिरावर केलेली सुंदर रोषणाई तसेच राहट पाळणे व इतर खेळण्यावरही प्रकाशदिवे उजळले असून, विविध हॉटेल, दुकानांमध्येही लाइट लावले असल्याने रात्रीच्या वेळेस हा संपूर्ण परिसर प्रकाशमय झालेला दिसतो. याचमुळे शहरास ग्रामीण भागातही अनेक जण रात्री येथे येऊन दर्शनाचा व यात्रेचा आनंद लुटण्याचा आस्वाद घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT